Wednesday, March 26, 2025
Homeमुख्य बातम्यापंतप्रधान मोदी यांची नगरला 7 तारखेला सभा

पंतप्रधान मोदी यांची नगरला 7 तारखेला सभा

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

नगर लोकसभा (Ahmednagar Loksabha) मतदारसंघातील मतदार ज्या सभेची आतूरतेने वाट पाहत आहेत. ती पंतप्रधान नरेंद्र मोदींची (Prime Minister Narendra Modi) सभा 7 मे रोजी नगरमधील सावेडी भागातील संत निरंकारी भवन जवळील मैदानावर होणार आहे. याबाबतची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांनी दिली.

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नगरमध्ये 6 तारखेला होणार होती. मात्र, पंतप्रधानांचा महाराष्ट्र (Maharashtra) दौरा एक दिवस पुढे ढकल्याने ही सभा आता 7 मे रोजी नियोजीत वेळेत होणार आहे. सध्या प्रचार अखेरच्या टप्प्यात असल्याने या सभेचे सर्वांना वेध लागले होते. पंतप्रधान मोदी (Prime Minister Narendra Modi) हे चौथ्यांदा नगरच्या भूमीत येत आहेत. निवडणुकीत आधीच खा. डॉ. सुजय विखे (MP Dr. Sujay Vikhe) यांनी प्रचारात आघाडी घेतली असल्याने सध्या जिल्ह्यात त्यांचे वातावरण असून पंतप्रधानांच्या सभेने त्यात अधीक भर पडणार आहे.

नगरच्या निरंकारी मैदान येथे पंतप्रधान मोदींच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. नगरकरांचे पंतप्रधान मोदी यांच्यावर विशेष प्रेम असून त्यांना ऐकण्यासाठी लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी लोटणार असून त्याचे नियोजन करण्यात सर्व महायुतीचे घटक पक्ष काम करत असल्याचे भालसिंग यांनी सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : 99 ग्रामपंचायतींची आज अंतिम मतदार यादी

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जानेवारी 2024 ते डिसेंबर 2025 या कालावधीत मुदत संपणार्‍या, नवनिर्मित, मागील निवडणुकांमध्ये चुकीची प्रभाग रचना झाल्यामुळे, तसेच बहिष्कार व इतर कारणांमुळे निवडणुका...