Saturday, May 4, 2024
Homeदेश विदेशCOVID19 Vaccine : पंतप्रधान मोदींनी घेतला करोना लसीचा दुसरा डोस

COVID19 Vaccine : पंतप्रधान मोदींनी घेतला करोना लसीचा दुसरा डोस

दिल्ली | Delhi

करोनाचा उद्रेक दिवसागणिक वाढताना दिसून येत आहे. वाढत्या करोना संक्रमणा दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी

- Advertisement -

गुरुवारी सकाळी नियमानुसार, कोविड लसीचा दुसरा डोस घेतला. पंतप्रधान मोदींनी Twitter वरून ही माहिती दिली. भारतात सुरू असलेल्या लसीकरण मोहिमेत सहभागी होत नरेंद्र मोदींनी १ मार्च रोजी लसीचा पहिला डोस घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली येथील AIIMS रुग्णालयात कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. नरेंद्र मोदी यांनी भारत बायोटेक कंपनीच्या COVAXIN लसीचा डोस घेतला.

पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करुन लोकांना लसीकरण करण्याचं आवाहन केलं आहे. त्यांनी ट्वीट केलं की, ‘आज AIIMS मध्ये मला कोरोना लसीकरणाचा दुसरा डोस देण्यात आला. लसीकरण म्हणजे, कोरोनाला हरवण्यासाठी आपल्याकडे असलेल्या काही उपायांपैकी एक उपाय आहे. जर तुम्ही लसीकरणासाठी लागू करण्यात आलेल्या अटी-शर्थींमध्ये येत असाल तर लगेच cowin.gov.in वर रजिस्ट्रेशन करुन लसीकरण करा.’

- Advertisment -

ताज्या बातम्या