Thursday, May 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर

  • नाशिक । प्रतिनिधी Nashik

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, १ मे रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.पंतप्रधान मोदी संपूर्ण दिवसभर मुंबईत असणार आहेत. त्यामुळं सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे.

- Advertisement -

बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये ‘वेव्ह्ज परिषद'( WAVES SUMMIT-2025) आहे. या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  हस्ते होणार आहे.

जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये 1 ते 4 मे दरम्यान ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’ होत आहे.पंतप्रधान मोदी उद्या १ मे रोजी दिवसभर मुंबईत थांबणार आहेत. त्यामुळे मुंबईत सुरक्षेत वाढ केली आहे.

वेव्हज् परिषदेमध्ये ९० हून अधिक देश, १० हजार प्रतिनिधी, एक हजार कलाकार, ३०० हून अधिक कंपन्या आणि ३५० हून अधिक स्टार्टअप्स सहभागी होणार आहेत. शिखर संमेलनात ४२ मुख्य सत्रे, ३९ विशेष सत्रे आणि ३२  मास्टरक्लासेस आयोजित करण्यात येणार आहेत. ज्यामध्ये ब्रॉडकास्टिंग, इन्फोटेन्मेंट, एव्हीजीसी- एक्सआर चित्रपट आणि डिजिटल मीडिया यांसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे.

उद्याच्या  उदघाटन कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्री एस.जयशंकर, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योग मंत्री उदय सामंत, सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड.आशिष शेलार आदी उपस्थित असणार आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

आग

Lucknow: लखनौत अग्नितांडव! चालत्या बसला भीषण आग; ५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू,...

0
लखनौ | Lucknow उत्तर प्रदेशच्या लखनौमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुरुवारी सकाळी किसनपथ परिसरात धावत्या बसने अचानक पेट घेतली. या अपघातात ५ प्रवाशांचा...