Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नागपूर दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या नागपूर दौऱ्यावर

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या, रविवारी नागपूर दौऱ्यावर येत आहेत. नागपूरमध्ये आयोजित विविध महत्त्वाच्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याबरोबर पंतप्रधान मोदी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या रेशीम बागेला तसेच दीक्षा भूमीला भेट देणार आहेत.

- Advertisement -

पंतप्रधान मोदी यांच्य हस्ते सोलार डिफेन्स आणि एअरोस्पेस लिमिटेड येथे संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक प्रकल्पांचे उद्घाटन होणार आहे. यावेळी अनमॅन्ड एरियल व्हेईकल्ससाठी १ हजार २५० मीटर लांबीची विशेष धावपट्टी आणि लोइटरिंग म्युनिशन चाचणीसाठी अत्याधुनिक सुविधा राष्ट्राला समर्पित केली जाणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

तसेच नागपुरातील माधव नेत्रालय प्रीमियम सेंटरच्या विस्तार प्रकल्पाची पायाभरणीही पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत केली जाणार आहे. या प्रकल्पांतर्गत २५० खाटांचे रुग्णालय, १४ बाह्यरुग्ण विभाग आणि अत्याधुनिक १४ ऑपरेशन थिएटर उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे नागपूर आणि विदर्भातील नागरिकांना जागतिक दर्जाच्या नेत्रचिकित्सा सुविधा उपलब्ध होणार आहेत.

याशिवाय मोदी हे दीक्षाभूमीला जाऊन भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणार आहेत. तसेच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘प्रतिपदा’ कार्यक्रमानिमित्त स्मृती मंदिराला भेट देऊन संघ संस्थापकांना अभिवादन करतील.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शासकीय

Nashik News: शासकीय कार्यालकांकडे थकला कोट्यावधी रुपयांचा कर; मनपासमोर थकबाकी वसुलीचे...

0
नाशिक | प्रतिनिधी नाशिक मनपा कर विभाग सामान्य नागरिकांची घरपट्टीची थकबाकी वसूल करण्यासाठी त्यांच्या मालमत्तांचा लिलाव करण्याची तयारी करीत आहे. मात्र दुसरीकडे शासकीय कार्यालयांकडेच मनपाची...