Tuesday, July 16, 2024
Homeनगरशिर्डीत नमो, नमो...! पंतप्रधान नरेंद्र मोदी साईचरणी लीन

शिर्डीत नमो, नमो…! पंतप्रधान नरेंद्र मोदी साईचरणी लीन

शिर्डी | Shirdi

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज शिर्डी दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शन घेऊन पूजा व आरती केली. यावेळी मंदिरात राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह अन्य नेतेमंडळी उपस्थित होते.

तसेच मंदिरातील नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटनदेखील त्यांच्या हस्ते पडणार आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याचे जलपूजन करणार आहे.

Live : पंतप्रधान मोदी शिर्डीच्या साई दरबारी; पाहा थेट प्रक्षेपण

त्यानंतर शिर्डी जवळील काकडी विमानतळ लगतच्या मोकळ्या मैदानात शेतकरी मेळाव्यात शेतकरी व नागरिकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी आरोग्य, रेल्वे, रस्ते, गॅस आणि तेल क्षेत्रातील सुमारे 7500 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन व लोकार्पण ते करणार आहेत.

ज्येष्ठ कीर्तनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचं निधन

- Advertisment -

ताज्या बातम्या