Monday, May 12, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNarendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित...

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर काय बोलणार?

नवी दिल्ली | New Delhi

जम्मू-काश्मीरच्या (Jammu and Kashmir) पहलगाममध्ये (Pahalgam) दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीय पर्यटकांचा मृत्यू (Death) झाला होता. यानंतर भारताने त्याला प्रत्युत्तर म्हणून ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवत पाकिस्तानमधील तब्बल ९ दहशतवादी ठिकाणांवर हवाई हल्ले करत बदला घेतला होता. त्यानंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतीय जवानांनी चोख प्रत्युत्तर दिले.

- Advertisement -

पाकिस्तानने (Pakistan) भारताच्या सीमेलगत असलेल्या अनेक शहरांना लक्ष्य करत ड्रोन हल्ले, मिसाईल हल्ले आणि गोळीबार केला. परंतु, पाकिस्तानचे प्रत्येक हल्ले भारताने मोडून काढले. यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात चार दिवसतणाव सुरू होता. अखेर अमेरिकेने (America) दोन्ही देशांसोबत चर्चा करत दोन्ही देशांच्या युद्धसंघर्षाला विराम लावला. या सर्व घडामोडींनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आज रात्री ८ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

दरम्यान, भारत आणि पाकिस्तानमध्ये (India and Pakistan) शस्त्रसंधी झाली असली तरी पाकिस्तानकडून हल्ले करण्यात येत आहे. यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पूर्णपणे मिटलेला नाही. त्यामुळे आज पंतप्रधान मोदी देशाला (Country) काय बोलणार याची उत्सुकता सर्वांना आहे.

मोदींचे बैठकांचे सत्र

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दि.२२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाल्यानंतर मोदी यांनी आपला परदेश दौरा अर्धवट सोडला होता. त्यानंतर मोदींनी देशात येऊन अनेक बैठका घेतल्या होत्या. केंद्रीय गृहराज्यमंत्री, संरक्षणंत्री, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार, तिन्ही सेनादलाचे प्रमुख यांच्यासोबत मोदी यांच्या महत्त्वाच्या बैठका पार पडल्या. या बैठकांत राष्ट्रीय सुरक्षा, दहशतवाद, भारताचे पाकिस्तानविरोधातील धोरण अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच या बैठकांनंतरच भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर राबवले. या सर्व घडामोडींनंतर आता मोदी देशाला संबोधित करणार आहेत.

सैन्यप्रमुखांचा पाकिस्तानला इशारा

भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटले की, आपल्याला हवाई संरक्षण कारवाईला समजून घेणे आवश्यक आहे. पाकिस्तानच्या पापाचा घडा भरला असून, आम्ही आधीच पूर्ण तयारी केली होती आणि त्यानुसारच कारवाई केली. आमची लढाई दहशतवाद आणि दहशतवाद्यांशी आहे, म्हणून आम्ही प्रथम दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला केला. पण पाकिस्तानने दहशतवाद्यांना पाठिंबा देणं योग्य मानले. पाकिस्तानने ही लढाई स्वतःची बनवली, म्हणूनच त्यांना प्रत्युत्तर देणं आवश्यक होते, असे सांगितले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Maharashtra News : राज्य सरकारची लष्कराच्या तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक; CM...

0
मुंबई | Mumbai  भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात युद्धबंदी झाली असली तरी भारतावरील (India) धोका अद्याप टळलेला नाही. त्यामुळे अजूनही भारताने सावध भूमिका...