Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजपंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पुणे दौऱ्यावर

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

- Advertisement -

राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या २६ सप्टेंबर २०२४ , गुरुवारी रोजी शिवाजीनगर ते स्वारगेटपर्यंतच्या भुयारी मेट्रो लोकार्पणासाठी पुणे दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदींच्या सभेचे आयोजन करण्यात आले असून यानिमित्ताने महायुतीकडून निवडणूक प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

भाजपचे नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नुकताच छत्रपती संभाजीनगर आणि नागपूरचा दौरा केला. या दौऱ्यात शहा यांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांना आगामी विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात आलेले अपयश लक्षात घेऊन भाजपच्या शीर्षस्थ नेत्यांनी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. त्यामुळे शहा यांच्यापाठोपाठ पंतप्रधान मोदी यांचा महाराष्ट्र दौरा महत्वाचा मनाला जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उद्या संध्याकाळी साडेपाच वाजता पुणे विमानतळावर आगमन होईल. पंतप्रधान मोदी विमानतळावरून थेट शिवाजीनगर मेट्रो स्थानकाच्या दिशेने रवाना होतील. तेथे शिवाजीनगर ते स्वारगेटपर्यंतच्या भुयारी मेट्रोला हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर नरेंद्र मोदी मेट्रोने प्रवास करत स्वारगेटला पोहचतील. तेथे स्वारगेट ते कात्रज या नव्या मेट्रो मार्गाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होईल. या कार्यक्रमानंतर नरेंद्र मोदी यांची एसपी महाविद्यालयाच्या मैदानात जाहिरसभा होईल. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आदी उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या