Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजNashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या नाशिकमध्ये सभा

Nashik News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्या नाशिकमध्ये सभा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उद्याशुक्रवारी (दि. 8) दुपारी 2 वा. पंचवटीतील मोदी मैदानावर जाहीर सभा होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील महायुतीच्या उमेदवारांसाठी होणारी ही पहिलीच सर्वात मोठी सभा असल्याने या सभेबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे.

आता राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले असून महायुतीच्या प्रचाराचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेने होणार आहे. हरियाणातील विजयाने भाजपमध्ये उत्साह संचारला आहे. त्याची पुनरावृत्ती करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. मोदींच्या भाषणातून देशाच्या विकासाचे सुनियोजित चित्र जनतेपुढे मांडले जाणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रभावी नेतृत्वाने जनहितार्थ केलेल्या कामामुळे राज्यात महायुतीवरील जनतेचा विश्वास वाढत आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुती जिंकेल. त्या दृष्टीने मोदी सभा महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य व संघजन प्रतिष्ठानचे ज्येष्ठ सदस्य प्रदीप पाटील यांनी म्हटले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवाद

Sharad Pawar: “आम्ही दहशतवाद संपवला, आता काही चिंता नाही असे सांगितले...

0
मुंबई | Mumbai पहलगाम बैसरन घाटीमध्ये पर्यटकावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानला जो संदेश दिला आहे, तो योग्यच आहे. अशा निर्णयात सर्वपक्षीयांनी सरकार सोबत...