Monday, June 24, 2024
Homeनाशिकसमाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी विकासकामांना प्राधान्य देणार : मंत्री भुजबळ

समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीसाठी विकासकामांना प्राधान्य देणार : मंत्री भुजबळ

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीच्या दृष्टीकोनातून आवश्यक त्या सर्व विकास कामांना प्राधान्य देणार असल्याचे राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी सांगितले. निफाड तालुक्यातील दहेगाव, वाहेगाव व भरवस येथील विविध विकास कामांच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी मंत्री भुजबळ बोलत होते.

यावेळी महावितरणचे कार्यकारी अभियंता केशव काळूमाळी, उपअभियंता रवींद्र पुरी, शाखा अभियंता तनुष चव्हाण, आर. फारुकी, सरपंच शरद भडांगे, सचिन दरेकर, मीना माळी, उपसरपंच चेतन आहेर आदी उपस्थित होते.

जागतिक बँकेकडून पंतप्रधानांचे कौतुक; म्हणाले ५० वर्षांचं काम…

मंत्री भुजबळ म्हणाले की, नागरिकांना आवश्यक असलेल्या मुलभूत सेवा-सुविधा आणि लोकोपयोगी कामांना प्राधान्य देवून त्यानुसार विकास कामांचे नियोजन करण्यात येत आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा अनुदानाचे पहिल्या हप्त्याचे वाटप करण्यात आले असून लवकरच दुसराही हप्ता वितरित केला जाईल. येणाऱ्या काळातही विकासाची कामे सुरू राहतील, असेही मंत्री भुजबळ यांनी सांगितले.

या कामांचे झाले लोकार्पण

  • निफाड तालुक्यातील दहेगांव येथे मुलभूत सुविधा योजनेंतर्गत सभामंडपाचे लोकार्पण.

  • निफाड तालुक्यातील वाहेगाव जिल्हा नियोजन मधुन सिंगल फेज ट्रान्सफार्मर बसविणे कामाचे लोकार्पण,

  • निफाड तालुक्यातील भरवस फाटा येथे स्थानिक विकास निधीमधुन पिक-अप शेडचे लोकार्पण करण्यात आले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

नाशिकमध्ये धो-धो; गंगापूरमधून विसर्ग वाढवला, ‘या’ धरणांमधूनही सोडले पाणी

- Advertisment -

ताज्या बातम्या