Friday, April 4, 2025
Homeजळगावकारागृह रक्षकाच्या पत्नीची गळफास घेवून आत्महत्या

कारागृह रक्षकाच्या पत्नीची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव jalgaon । प्रतिनिधी

जिल्हा कारागृहात रक्षक म्हणून नोकरीस असलेल्या विशाल राजेंद्र सोनवणे यांची पत्नी कल्याणी विशाल सोनवणे (वय-27,रा.प्रज्ञा कॉलनी) यांनी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी उघडकीस आली. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

याबाबत पोलिसांनी दिले ली माहिती अशी की, विशाल सोनवणे हे मंगळवारी रात्रपाळीला ड्युटीवर होते. त्यामुळे घरी त्यांची पत्नी, कल्याणी, सासू, सासरे व मुलगी असेच होते. सकाळी विशाल हे घरी परतले असता त्यांना पत्नी कल्याणी या वरच्या मजल्यावरुन खाली का आल्या नाहीत. हे बघण्यासाठी ते वरच्या मजल्यावर गेले असता, त्यांना आपली पत्नी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आली. त्यांनी तात्काळ घटनेची माहिती तालुका पोलीसांना दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील यांनी घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह शासकीय रुग्णालयात हलविला. त्यांच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : चाकूचा धाक दाखवून महिलेचे दागिने लुटले

0
शिरूर (तालुका प्रतिनिधी) यवतमाळ जिल्ह्यातील नेर तालुक्यात राहणाऱ्या ४० वर्षीय सुलोचना दुधाराम राठोड यांच्याकडील सव्वा तोळे सोन्याचे दागिने चोरट्यांनी लुटले. या दागिन्यांची किंमत ९१ हजार...