Friday, November 22, 2024
HomeराजकीयPrithviraj Chavan : महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यास केंद्रातील सरकार पडणार, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा...

Prithviraj Chavan : महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यास केंद्रातील सरकार पडणार, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा दावा

मुंबई | Mumbai

सध्या राज्यात लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभेसाठी आता सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. तसेच राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे.

- Advertisement -

सध्या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून चर्चा सुरु आहेत. त्यातच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी खळबळजनक दावा केला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यास केंद्रातील नरेंद्र मोदींचे सरकार पडणार असल्याचा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. गोपालदास अग्रवाल यांनी काँग्रेसचा झेंडा हाती धरला, यावेळी पृथ्वीराज चव्हाण बोलत होते.

हे ही वाचा : उमेदवारीची ‘माळ’ की हाती ‘टाळ’ याकडे श्रीगोंदाकरांचे लक्ष

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार हे दोघेही सत्तेतून बाहेर पडतील. त्यामुळे अटलबिहारी वाजपेयी यांच्या १३ महिन्यांच्या सरकारची पुनरावृत्ती होईल. तसेच, बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या, संविधान बचाव यासारखे अनेक मुद्दे केंद्र सरकार किंवा राज्यातील तिघाडी सरकारला सोडवता आलेले नाहीत. म्हणूनच महाराष्ट्रातल्या तीन तिघाडा काम बिघाडा सरकारमध्ये प्रचंड तणाव निर्माण झालाय, असंही पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

तसेच, पूर्व विदर्भातील मतदारांनी भाजपचा दणदणीत पराभव केला. राहुल गांधी यांना लोकसभेत विरोधी पक्षनेते बनवण्याची कामगिरी केली, त्याबद्दल गोंदियावासियांचे आभार, आगामी विधानसभा निवडणुकीतही नेत्रदीपक कामगिरी होईल, याबद्दल मला शंका नाही. भंडारा-गोंदिया परिसरात नानाभाऊंचं काम हलकं झालं आहे. त्यामुळे ते आता राज्यभरात फिरू शकतात आणि या दोन्ही जिल्ह्यात गोपालदास अग्रवाल हे काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या सर्व जागा जिंकून आणण्याची जबाबदारी घेऊ शकतात, असं चव्हाण म्हणाले.

हे ही वाचा : धक्कादायक! Youtube वर पाहून ऑपरेशन केलं, मुलाने गमावला जीव… ‘मुन्नाभाई डॉक्टर’ला अटक

दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचालींना वेग आल्याचा दावा गेल्या आठवड्यात केला होता. महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे, बदलापुरात झालेली घटना यामुळे सरकारच्या कार्य पद्धतीवरच अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. या नकारात्मक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाणार आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या