Tuesday, March 25, 2025
HomeराजकीयPresident Rule Maharashtra : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली?

President Rule Maharashtra : महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचाली?

मुंबई । Mumbai

महाराष्ट्रात आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विविध राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सध्या सर्वच नेते हे महाराष्ट्रातील विविध भागात पाहणी करत मतदारसंघांची चाचपणी करत आहेत. तर काही पक्षांत इनकमिंग-आऊटगोईंगला सुरुवात झाली आहे.

- Advertisement -

त्यातच आता त्यातच आता माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या हालचालींना वेग आल्याचा दावा केला आहे. चव्हाण यांनी केलेल्या दाव्यामुळे आता राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. तर आगामी काळात खरंच असे होणार का? याबाबत चर्चा सुरू आहेत.

हे ही वाचा : नगर-मनमाड रस्त्याबाबत पालकमंत्र्यांकडून दिशाभूल; खा. लंके यांचा आरोप

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, मालवण पुतळा प्रकरण, बदलापूरची घटना यामुळे जनतेला सरकारविषयी प्रचंड रोष आहे. पुतळ्यावरून तर राज्यभर संतप्त भावना उमटत आहेत. गेल्या १०० वर्षांत देशात कधी पुतळा पडला नाही. त्यामुळे जगभरातही उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. केंद्रीय संस्थांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार, महाविकास आघाडीला जवळपास १८० च्या आसपास जागा मिळतील. त्यामुळेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करायची. यानंतर काही काळ गेल्यानंतर तसेच वातावरण शांत झाल्यानंतर निवडणुकांना सामोरे जायचे आहे, असे त्यांच्याकडून यावेळी सांगण्यात आले.

तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम कोणत्या एजन्सीला दिले होते? त्याची कागदपत्रे तातडीने जाहीर केली पाहिजेत. ज्यांनी महाराजांचा पुतळा बनवला ते कोणाच्या जवळचे होते? यावरूनही चर्चा सुरू आहे. अशा चर्चा समाजात वातावरण बिघडले आहे. त्यामुळे तातडीने या प्रकरणाची सगळी माहिती जनतेपुढे आणली पाहिजे. पुतळ्याच्या प्रकरणी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माफी मागितली. मात्र, देवेंद्र फडणवीस यांनी अद्यापही माफी मागितली नाही, असेही चव्हाण म्हणाले.

हे ही वाचा : मंत्री तानाजी सावंत पुन्हा वादात, शेतकऱ्याची थेट औकात काढली… व्हिडिओ व्हायरल

दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. हरियाणा विधानसभेची मुदतही ३ नोव्हेंबरपर्यंत आहे. त्यामुळे या दोन राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. तसेच ४ जानेवारी २०२५ पर्यंत झारखंड विधानसभेची मुदत आहे. यंदा दिवाळी २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या कालावधीत निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र निवडणुकांच्या तारखा पुढे ढकलल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत, तसंच पृथ्वीराज चव्हाण यांनी हा दावा केल्यानेही चर्चा सुरु झाली आहे.

हे ही वाचा : जिल्ह्यात विधानसभेसाठी ३७ लाखांवर मतदार, महिला मतदारांची संख्या वाढली

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Prashant Koratkar : “तेलंगणात कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी लपून बसलेला होता”;...

0
मुंबई | Mumbai छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इतिहास संशोधक इंद्रजित सावंत (Indrajit Sawant) यांनी धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरला कोल्हापूर पोलिसांनी काल (दि.२४) रोजी...