Tuesday, March 25, 2025
Homeनगरखासगी सहाय्यकाची नियुक्ती केल्यास तलाठ्यावर होणार कारवाई

खासगी सहाय्यकाची नियुक्ती केल्यास तलाठ्यावर होणार कारवाई

शासन मान्यता जागा सोडून कामकाज करणेही ठरणार महागात

संगमनेर |वार्ताहर| Sangamner

राज्यात अनेक ठिकाणी कामगार तलाठी यांचे कार्यालय खासगी ठिकाणी सुरू आहेत. त्याचबरोबर अनेक तलाठ्यांनी आपल्या हाताखाली शासकीय कामकाज करण्यासाठी खासगी व्यक्तींची परस्पर नियुक्ती केल्या असल्याची तक्रार राज्य लाचलुचपत विभागाच्यावतीने शासनाकडे करण्यात आली होती. महसूल विभागाला तक्रार प्राप्त झाल्यानंतर कक्ष अधिकार्‍यांच्यावतीने अखेर अशा प्रकारचे वर्तन करणार्‍या तलाठ्यांवर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्याच्या अपर महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई यांनी सापळा पडताळणी कारवाई दरम्यान तलाठी हे त्यांचे शासकीय कामकाज एखाद्या खासगी कार्यालयातून करतात.

- Advertisement -

तसेच त्यांची शासकीय कामे करण्यासाठी अनधिकृतपणे खासगी व्यक्तींची नियुक्ती केली आहे. अशा व्यक्तीकडून शासकीय कामे करवून घेतली जातात. तसेच खासगी कार्यालयात शासकीय दस्तावेज ठेवतात. ही बाब कारवाईसाठी शासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यानुषंगाने कक्ष अधिकारी यांनी आदेश दिले आहे की, महाराष्ट्र जमीन महसूल संहितामधील तरतुदीनुसार ग्राम महसूल अधिकारी, तलाठी यांची कर्तव्ये व जबाबदार्‍या नमूद केलेल्या आहेत. सदर कर्तव्य व जबाबदार्‍या पार पाडताना ग्राम महसूल अधिकारी यांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. तसेच, महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, 1979 अन्वये प्रत्येक शासकीय कर्मचारी, अधिकारी यांनी त्यांचे कर्तव्य पालन करताना, वर्तणूकविषयक नियम विहित करण्यात आलेले आहेत. सदर नियमांचे पालन प्रत्येक शासकीय कर्मचारी,अधिकारी यांनी करणे आवश्यक आहे.

ग्राममहसूल अधिकारी हे नेमून दिलेल्या सज्जाच्या ठिकाणी काम करतात. सदर सज्जा कार्यालये शासकीय जागांमध्ये अथवा शासन मान्यता प्राप्त भाड्याच्या जागांमध्ये आहेत. त्यामुळे ग्राम महसूल अधिकारी यांनी शासकीय कामकाज खासगी कार्यालयातून करण्याचा प्रश्न उद्भवत नाही. तसेच, ग्राम महसूल अधिकारी यांनी शासकीय कामकाज करण्यासाठी खासगी व्यक्ती, मदतनीस नेमण्याबाबत शासन स्तरावरून कोणत्याही सूचना देण्यात आलेल्या नाहीत.तलाठी हे शासकीय कामकाज खासगी कार्यालयातून करत असल्याचे, खासगी जागेमध्ये शासकीय दस्तऐवज ठेवत असल्याचे निर्दशनास आल्यास तसेच, शासकीय कामकाज करण्यासाठी खासगी व्यक्ती नेमत असतील तर संबंधित तलाठी यांच्याविरूद्ध शासनाच्या सध्याच्या नियमांतर्गत तात्काळ उचित कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sanjay Raut : “२०१४ मध्ये युती तोडण्यास…”; राऊतांनी फडणवीसांची बाजू घेत...

0
नाशिक | Nashik महाराष्ट्राच्या राजकारणात (Maharashtra Politics) मागील दशकभरात अनेक मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. दोन दशकांहून अधिक काळ सोबती असलेल्या भाजप आणि शिवसेना (BJP and...