Monday, June 24, 2024
Homeनगरखासगी रुग्णालय, प्रयोग शाळेने डेंग्यूची माहिती कळविणे बंधनकारक

खासगी रुग्णालय, प्रयोग शाळेने डेंग्यूची माहिती कळविणे बंधनकारक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

सहा महिन्यांपासून जिल्हा तब्बल 228 रुग्ण डेंग्यूच्या तापाने फणफणले आहेत. यातील दोघांना जीव गमवावा लागला. यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभाग अ‍ॅक्शन मोडवर आले असून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे थेट फिल्डवर उतरले आहेत. तसेच आता डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची माहिती संबंधित उपचार करणारे खासगी रुग्णालये आणि डेंग्यू अहवाल पॉझिटीव्ह देणार्‍या खासगी प्रयोग शाळा यांनी याबाबतची माहिती जवळच्या शासकीय यंत्रणेला कळवण्याचे आदेश झेडपी आरोग्य विभागाने काढले आहेत. अन्यथा कारवाई संबंधीतांवर कायदेशीर करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात सध्या गावोगाव डेंग्यूचे रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे नगर शहरासह ग्रामीण भागातील दवाखाने आणि रुग्णालय खचाखच भरली आहेत. दुसरीकडे सर्वत्र कोणत्याही तापाला डेंगीचा ताप समजले जात असल्याने चिंतेचे वातावरण आहे. जिल्ह्यात हिवतापासोबतच चिकुनगुण्याचेही रुग्ण आहेत. गेल्या काही दिवसात नगर तालुक्यातील मेहेकरी व नेवाशातील सोनई या गावातील रुग्णांचा डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येते आहे. मात्र, नाशिकची मृत्यू संशोधन समिती संबंधितांचा मृत्यू नेमका कोणत्या कारणांतून झाला, याची तपासणी करत आहेत. त्याच्या अहवालनानंतर तथ्य समोर येणार असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.

नगर शहरात महापालिका आणि ग्रामीण भागात झेडपी आरोग्य विभाग कार्यरत असून त्यांच्या जोडीला जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय आहेत. याठिकाणी साथजन्य काळात विविध उपाययोजनांसह त्या उद्भवून नयेत, यासाठी प्रचार आणि प्रसिध्द करण्यात येत आहे. मात्र, सध्या ग्रामीण भागात तापाचे रुग्ण वाढत असून त्यावर नियंत्रण उपचार करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागातील रिक्त जागा अडसर ठरत आहे. जिल्ह्यात 1 हजार 318 ग्रामपंचायतींसाठी अवघे 500 आरोग्यसेवक आहेत. त्यातही त्यांना इतर कामे करावी लागतात. सुट्ट्या किंवा रजांचा विचार केल्यास त्यांना कामास फारसा वेळच मिळत नाही. ज्या गावांत बाधित रुग्ण आढळतील तेथे ग्रामपंचायतीमार्फत प्रबोधन केले जाते.

डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर 87 गावांत धूळफवारणी करण्यात आलेल्या झेडपीकडून सांगण्यात आले. यासह तापाच्या रुग्णाचे जानेवारीपासून रक्त नमुने घेण्यात येत आहेत. यात 1 हजार 209 संशयीत डेंग्यूचे, तर हिवतापाचे 5 लाख 64 हजार 653 नमुने तपासले आहेत. यात हिवताप बाधितांचे 2, डेंग्यूची बाधा झालेले 228 आणि एकाला चिकणगुणी झाल्याचा अहवाल शासकीय आरोग्य विभागाने दिला. उर्वरित सर्वांवर संशीयत डेंग्यू बाधित म्हणून खासगी आरोग्य संस्थेत उपचार करण्यात आलेले आहेत अथवा करण्यात येत आहे. नेवासा तालुकुक्यातील सोनईतील डेंग्यूच्या मृत्यूमुळे आरोग्य विभाग कामाला लागले असून स्वत: आरोग्य अधिकारी डॉ. नागरगोज फिल्डवर जावून पाहणी करत आहे. यासह आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांच्या व्हीसीव्दारे बैठका घेवून त्यांना सुचना करत आहे. हिवताप आणि डेंग्यू बाधितांच्या उपचारात हालगर्जीपणा नको, अशा स्पष्ट सुचना डॉ. नागरगोजे यांनी दिल्या आहेत.

तसेच गुरूवारपासून जिल्ह्यात डेंंग्यूचा अहवाल पॉझिटीव्ह देणार्‍या प्रयोग शाळा आणि उपचार करणार्‍या खासगी प्रयोग शाळा यांना डेंग्यू रुग्णांची माहिती शासकीय आरोग्य संस्थांना कळवणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे जिल्ह्यातील डेंग्यूची वस्तूस्थिती समोर येणार आहे.

जिल्ह्यात शासकीय प्रयोग शाळेच्या अहवालानूसार आतापर्यंत 228 रुग्णांचे डेंग्यूचे अहवाल पॉझिटीव्ह आलेले आहे. यामुळे ग्रामीण भागात तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी जागृकपणे काम करण्यासोबत डेंग्यूला कारणीभूत असणार्‍या डांसाची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक असणार्‍या उपाययोजना करण्याच्या सुचना दिल्या आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागावर थेट लक्ष ठेवण्यात येत असून डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी सर्वोपरीने प्रयत्न करण्यात येजत आहे.

– डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

- Advertisment -

ताज्या बातम्या