दिल्ली l Delhi
जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय कुस्तीपटू प्रिया मलिकने इतिहास घडवला आहे. प्रिया मलिकने (Wrestler Priya Malik)…
- Advertisement -
भारतीयांच्या माना उंचावल्या असून हंगेरी येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत (World cadet wrestling championship) सुवर्णपदक मिळवलं आहे. प्रिया मलिकने (Priya Malik) या स्पर्धेत ७५ किलोग्राम वजन गटात सुवर्णपदक पटकावलं आहे. तिने बेलारूसच्या कुस्तीपटूला ५-० च्या फरकाने पराभूत करत हे सुवर्ण पदक मिळवलं आहे.
दरम्यान, प्रिया मलिकने (Priya Malik) याआधी २०१९ मध्ये पुण्यात (Pune) खेलो इंडियात (Khelo India) सुवर्णपदक, २०१९ मध्ये दिल्लीतील १७ व्या स्कूल गेम्समध्ये सुवर्णपदक आणि २०२० मध्ये पाटणा येथे झालेल्या राष्ट्रीय कॅडेट चँपियनशिपमध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली आहे.