Wednesday, April 30, 2025
Homeदेश विदेशउत्तर प्रदेश पोलिसांनी माझा गळा दाबला – प्रियांका गांधी

उत्तर प्रदेश पोलिसांनी माझा गळा दाबला – प्रियांका गांधी

लखनऊ – उत्तर प्रदेश पोलिसांनी माझा गळा दाबला आणि मला धक्का देऊन पाडण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी यांनी केला आहे. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये दोन दिवसांच्या दौर्‍यावर असलेल्या प्रियांका गांधी यांचा ताफा पोलिसांनी अडवला.

नागरिकत्व संशोधन कायद्याचा विरोध करताना झालेल्या हिंसक आंदोलनप्रकरणी अटकेत असलेल्या माजी आयपीएस एस. आर. दारापुरी आणि काँग्रेस प्रवक्ता सदफ जफर यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी प्रियांका जात होत्या.

- Advertisement -

प्रियांका म्हणाल्या, आम्हाला रस्त्यावर अडवण्याला काही अर्थ नाही. हे प्रकरण एसपीजीचं नाही; ते उत्तर प्रदेश पोलिसांच्या अखत्यारित येतं.

आमची गाडी पोलिसांनी रस्त्यात अचानक रोखली. आम्ही तुम्हाला जाऊ देणार नाही असं सांगितलं. मी उतरून पायी चालू लागले, तेव्हा पोलिसांनी मला घेरलं. माझा गळा दाबला आणि मला धक्का देऊन पाडवलं. माझ्यासोबत गैरव्यवहार झाला. यानंतर मी पक्षाच्या कार्यकर्त्यासह स्कूटीवर बसून जाऊ लागले, तेव्हा पोलिसांनी मला पुन्हा अडवले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ahilyanagar : ‘प्रवरे’च्या आजी-माजी संचालकांवर गुन्हा दाखल; काय आहे प्रकरण ?

0
राहाता |प्रतिनिधी| Rahata प्रवरानगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात साडेआठ कोटींच्या बोगस कर्जमाफी प्रकरणी आजी-माजी संचालक, साखर आयुक्त पुणे, संबंधित दोन...