Thursday, November 14, 2024
Homeराजकीयप्रियंका गांधी, स्वरा भास्कर यांनी मुख्यमंत्री योगींच्या राजीनाम्याची केली मागणी

प्रियंका गांधी, स्वरा भास्कर यांनी मुख्यमंत्री योगींच्या राजीनाम्याची केली मागणी

मुंबई | Mumbai

हाथरस सामूहिक बलात्कार (Hathras Gangrape) प्रकरणातील पीडितेचा उपचार सुरु असताना रुग्णालयात निधन झाले. या घटनेवरून देशभरातून लोक संताप व्यक्त करत आहेत. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीही सोशल मीडियावरून आपला संताप व्यक्त करत आहेत. यातच कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) आणि अभिनेत्री स्वरा भास्करने (Swara Bhaskar) उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Uttar Pradesh Chief Minister Yogi Adityanath) यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

- Advertisement -

प्रियांका गांधी यांनी ट्विट करत म्हटले आहे की, “रात्री अडीच वाजता कुटुंबीयांनी विणवनी केली पण हाथरस पीडितेचा मृतदेह जबरदस्तीने यूपी प्रशासनाने जाळला. ती जिवंत असताना सरकारने तिला संरक्षण दिले नाही, जेव्हा तिच्यावर हल्ला झाला तेव्हा सरकारने वेळेवर उपचार दिले नाहीत. पीडितेच्या मृत्यूनंतर सरकारने कुटुबीयांकडून मुलीच्या अंत्यसंस्काराचा हक्क काढून घेतला आणि मृताला सन्मान दिला नाही, असा आरोप प्रियंका गांधी यांनी केला आहे. तसेच, मोठी अमानुषता, तुम्ही गुन्हेगारी थांबवली नाहीत, उलट तुम्ही गुन्हेगारांसारखी वर्तवणूक केली. अत्याचार थांबवला नाही, एक निष्पाप मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांचा दुप्पट छळ केला.” तसेच प्रियंका गांधी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.

तसेच अभिनेत्री स्वरा भास्करने ट्विट करत म्हंटले आहे की, “आता वेळ आली आहे की, योगी आदित्यनाथ यांनी राजीनामा दिला पाहिजे. त्यांच्या राज्यात कायद्याच्या चिंधड्या उडवल्या जात आहे. त्यांच्या पॉलिसीजने जातीवरून भांडणे सुरू आहेत. खोटे एनकाऊंटर्स होत आहेत, गॅंगवॉर होत आहे आणि उत्तर प्रदेशमध्य बलात्काराची महामारी पसरली आहे. हाथरस केस हे केवळ एक उदाहरण आहे.”

पीडित मृत मुलीच्या प्रेतावर रात्रीत अंत्यसंस्कार करण्यात आले हे योगी सरकारचे अमानवी आणि न शोभणारे कृत्य – जयंत पाटील

घरातील लोकांच्या गैरहजेरीत भारताच्या पीडित मृत मुलीच्या प्रेतावर रात्रीत अंत्यसंस्कार करण्यात आले हे योगी सरकारचे अमानवी आणि न शोभणारे कृत्य आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

हाथरस येथील पिडीत तरुणीचा अमानवी कृत्यानंतर मृत्यू झाला होता. त्यावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दु:ख व्यक्त केले होते परंतु त्या पीडित मुलीच्या प्रेतावर अंत्यसंस्कारही तिच्या नातेवाईकांसमोर करण्यात आले नाहीत याबद्दल मंत्री जयंत पाटील यांनी ट्वीट करून नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान मुलींना जिवंतपणी सन्मान दिला जातोय ना मेल्यानंतरही असे भावनिक ट्वीट करुन मंत्री जयंत पाटील यांनी उत्तरप्रदेश सरकारबद्दल तीव्र संताप व्यक्त केला आहे.

योगी आदित्यनाथ हे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेत असतील तर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा घेतली पाहिजे. तुम्ही न्याय, सन्मान आणि समानतेचे राज्य निर्माण करु शकत नाही तर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेण्याचा कोणताच अधिकार नाही अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी योगी आदित्यनाथ यांना फटकारले आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या