नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi
पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) ‘द केरळ स्टोरी’ (The Kerala Story) या चित्रपटाला बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी उठवण्यात यावी यासाठी निर्माते विपुल शाह सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेणार आहेत…
चित्रपटावरील बंदीचा वाद आधीच सुप्रीम कोर्टात पोहचला आहे. या चित्रपटावर बंदी घालण्यात यावी अशी याचिका दाखल करण्यात आली होती. पण आता या चित्रपटाचे निर्मातेच आता सुप्रीम कोर्टात धाव घेणार असल्याचे समोर आले आहे.
भ्रष्टाचाराप्रकरणी पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक
चित्रपटाचे निर्माते विपुल शाह यांनी सांगितले की, टीएमसी सरकारने घातलेल्या बंदीच्या विरोधात ते कायदेशीर कारवाई करणार आहेत. पश्चिम बंगाल सरकारने सांगितले की, ‘द्वेष आणि हिंसाचाराची कोणतीही घटना टाळण्यासाठी आणि राज्यात शांतता राखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर त्वरित बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. तसंच बंदीचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही सिनेमागृहावर कारवाई केली जाणार असल्याचे देखील पश्चिम बंगाल सरकारने जाहीर केले आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
Samruddhi Mahamarg : मोठी बातमी! समृद्धी महामार्गावरील पूल कोसळला