Saturday, September 14, 2024
Homeजळगावतांदलवाडीत वैद्यकीय व्यावसायिकाने घेतले चार एकरांत 93 टन टरबुुजाचे उत्पादन

तांदलवाडीत वैद्यकीय व्यावसायिकाने घेतले चार एकरांत 93 टन टरबुुजाचे उत्पादन

रावेर । Raver

- Advertisement -

रावेर तालुका हा केळी बेल्ट (Banana belt) म्हणून ओळखला जातो.मात्र केळीवर येणार्‍या नैसर्गिक संकटापुढे शेतकरी हतबल असल्याने,शेतकरी केळीला पर्यायी पिके शोधात आहे.यातून निरनिराळ्या पिकांच्या लागवडी केळी पट्ट्यात होतांना दिसत आहे. मसाले पिके व टरबूज,चिया सारखी औषधी गुणधर्म असलेली वनस्पती हि पिके फुलत आहे.नवीन प्रयोग करत असले तरी यात काही ठिकाणी यश मिळाल्याने,शेतकर्‍यांच्या हिंमतीचे कौतुक होते.असेच प्रयत्न तांदलवाडी येथील डॉक्टर वैभव पाटील यांचा आहे.त्यांनी टरबूज (watermelons) लागवड करून चार एकरात 93 टन विक्रमी उत्पन्न घेतले आहे.याबद्दल केळी पट्ट्यात डॉ.पाटील यांचे सोशल मीडियात मोठे कौतुक होतांना दिसत आहे.

बारावीच्या विद्यार्थ्यांनो इकडे लक्ष द्या : जुनपासून पदवी अभ्यासक्रम राहणार चार वर्षाचा..
25 कोटींची पाणी पुरवठा योजना तरीही वरणगावकरांच्या नशिबी पाणी टंचाईच…

येथील डॉ.वैभव पाटील यांचे रावेर येथे विश्वधन आयुर्वेदिक सुपर स्पेशलिटी पंचकर्म हॉस्पिटल आहे.यासोबत ते शेती देखील सांभाळतात,अतिशय उत्तम व निर्यातक्षम केळी बागा व इतर पिकांचे उत्पादन घेण्यात त्यांचा हातखंडा आहे.यंदा त्यांनी टरबूज लागवडीचा नवीन प्रयोग करून पाहिला,यात चार एकर लागवड असलेल्या टरबूज पिकांचे त्यांनी 4 महिन्यात 93 टन उत्पादन घेतले आहे.

Makeup Part 6 : न्यू जनरेशन कॉस्मेटिक्सबेताच्या परिस्थितीत गुरूशिष्याच्या चढाओढीत गुंजनची चित्रकला बहरली

यातुन त्यांना पावणे पाच लाखाचे उत्पन्न झाले.हा प्रयोग यशस्वी झाल्याने,डॉ.पाटील यांचे खूप अभिनंदन होत आहे.डॉ.पाटील यांची मेहनत उद्न्मुख युवा शेतकर्‍यांना प्रेरणा देणारी आहे.केळी पट्यात केळीला पर्याय म्हणून विविध पिकांचे उत्पादन घेण्यात शेतकरी धडपडत आहे.यात डॉ.वैभव यांचा प्रयोग अशा शेतकर्‍यांना नक्की बळ देणारा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या