Thursday, March 13, 2025
Homeनाशिकप्रा. दादासाहेब रत्नपारखी यांचे निधन

प्रा. दादासाहेब रत्नपारखी यांचे निधन

नाशिक | प्रतिनिधी Nashik

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जडणघडणीत गोळवलकर गुरुजी यांच्या समवेत कार्य केलेले आरएसएसचे नाशिक विभाग कार्यवाह व एचपीटी महाविद्यालयातील निवृत्त प्राध्यापक दादासाहेब अर्थात रमेशचंद्र धोंडोपंत रत्नपारखी (९६) रात्री आठ वाजेच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांचा मुलगा सातपूर औद्योगिक क्षेत्रातील प्रसिद्ध उद्योजक राजेश रत्नपारखी, सुन व नात असा परिवार आहे. त्यांच्यावर अंत्यसंस्कार उद्या (दि.२) सकाळी आठ वाजता गाठी असलेल्या अमरधाम येथे केले जाणार आहे.

- Advertisement -

दादासाहेब रत्नपारखी हे लहानपणापासूनच संघाचे स्वयंसेवक होते. त्यांनी गोळवलकर गुरुजी समवेतही संघाचे काम केले. त्यानंतर अनेक वर्षे ते संघाचे स्वयंसेवक व नाशिक शहर कार्यवाह, डोळे नाशिक जळगाव यातील जिल्ह्यांचे विभाग कार्यवाह म्हणूनही काम केले आहे. भोसला मिलिटरी एज्युकेशन संस्थेच्या जनरल सेक्रेटरी पदी तसेच शंकराचार्य न्यासचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एचपीटी महाविद्यालयात ते प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी संघाचे काम अधिक जोमाने सुरू केले होते. संघाचे जुने स्वयंसेवक व एक आदर्श व्यक्ती म्हणून ते नाशिककरांना परिचित होते. वयोमानामुळे ते सध्या घरातच होते. आज सायंकाळी अल्पशा आजाराने व वृद्धापकाळाने त्यांचे निधन झाले.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...