Tuesday, June 16, 2026
Homeक्राईमCrime News : व्यावसायिकाचे घर फोडून तीन लाखांचा ऐवज लंपास

Crime News : व्यावसायिकाचे घर फोडून तीन लाखांचा ऐवज लंपास

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

व्यावसायिकाच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी 80 हजार रूपयांची रोकड, सुमारे पाच तोळ्याचे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने असा एकुण दोन लाख 95 हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केला. सावेडी उपनगरातील तांबटकर मळा, ममता गॅस जवळ 1 ते 3 मार्च दरम्यान ही घटना घडली आहे. या प्रकरणी गोविंद बलराज बेहेल (वय 62) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा 3 मार्च रोजी सायंकाळी दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

बेहेल हे ममता गॅस जवळ भाडोत्री घरात राहतात. ते उपचारासाठी 30 जानेवारी 2026 रोजी पुणे येथे गेले होते, त्यानंतर ते मुलीकडे नाशिक येथे गेले होते. त्यामुळे घर काही काळ बंद होते. याच संधीचा फायदा घेऊन चोरट्यांनी घराचा कडी-कोंडा तोडून आत प्रवेश केला. घरामध्ये ठेवलेली 80 हजार रूपयांची रोख रक्कम, सोन्याच्या अंगठ्या, मंगळसूत्र, कर्णफुले असा सुमारे पाच तोळ्यांचा ऐवज, तसेच चांदीचे विविध दागिने व इतर मौल्यवान वस्तू असा एकूण दोन लाख 95 हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.

घराची देखभाल करणार्‍या महिलेला दरवाजाचे कुलूप तोडल्याचे निदर्शनास आल्यावर ही चोरी उघडकीस आली. माहिती मिळताच बेहेल यांनी नातेवाईकांना बोलावून पोलिसांना कळवले. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी ठसे तज्ज्ञांच्या मदतीने तपासणी केली आहे. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास सुरू केला असून, या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

Maharashtra Politics : राज्यात पुन्हा ऑपरेशन टायगरची चर्चा; आदित्य ठाकरे म्हणाले,...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत मिळत असून, 'ऑपरेशन टायगर' या नव्या राजकीय समीकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. ठाकरे गटाचे...