Friday, April 25, 2025
Homeनगरप्राध्यापकाचे विद्यार्थिनीशी अश्लील चॅटिंग

प्राध्यापकाचे विद्यार्थिनीशी अश्लील चॅटिंग

निलंबनासाठी अकोलेत रास्ता रोको, काही काळ तणाव

अकोले |प्रतिनिधी| Akole

विद्यार्थिनीशी अश्लील चॅटिंग केल्याच्या आरोपावरुन येथील एका महाविद्यालयीन प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई करावी, या मागणीसाठी झालेल्या आंदोलनामुळे अकोलेत काही काळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती. सकल हिंदू समाजाच्या नेतृत्वाखाली येथील महात्मा फुले चौकात काही काळ रास्ता रोकोही करण्यात आला. संबंधित संस्थेच्या सचिवांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय चौकशी समिती नेमली जाईल, समितीच्या अहवालानंतर योग्य ती कारवाई केली जाईल,असे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला.

- Advertisement -

अकोले शहरातील संबंधित महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने विद्यार्थिनीशी अश्लील चॅटिंग केल्याच्या आरोपावरुन हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ संबंधित प्राध्यापकाच्या विरोधात निषेधाच्या घोषणा दिल्या. तेथून हा जमाव पोलीस ठाण्यात गेला. तेथे यासंबंधी निवेदन देण्यात आले व संबंधित प्राध्यापकावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. यानंतर घोषणा देत जमाव महात्मा फुले चौक येथे गेला. काही काळ रस्त्यावरील दुकाने बंद करण्यात आली. त्यामुळे शहर बंद सारखी स्थिती निर्माण झाली होती.

महात्मा फुले चौक येथे काही वेळ रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप करत संस्था पदाधिकारी व आंदोलक कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधला. यावेळी सकल हिंदू समाजाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळाले. संबंधित संस्थेच्या सचिवांनी या आरोपांबाबत त्रिसदस्यीय समिती नियुक्त करून चौकशीचा अहवाल आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर तणाव निवळला.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...