मालेगाव | प्रतिनिधी Malegaon
येथील मुनिसिपल हायस्कूल व जूनियर कॉलेजमध्ये आज चौकशीसाठी आलेल्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यां समोर एका प्राध्यापकास सततच्या चौकशीचे मानसिक तणावाने कार्यालयातच हृदयविकाराचा झटका आल्याने त्यातच त्यांचे प्राणोतक्रमण झाले या घटनेने शैक्षणिक वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे
दरम्यान या घटनेने संतप्त झालेल्या शिक्षक, प्राध्यापक व सेवकांनी शहर पोलीस ठाण्यात प्रा, बोरसे यांच्या मृत्यू जबाबदार असलेल्या शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही असा पवित्रा संतप्त शिक्षकांनी घेतला होता अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांनी ठिय्या आंदोलन करत असलेल्या शिक्षकांची भेट घेत या घटनेची सखोल चौकशी करून गुन्हा दाखल केला जाईल अशी ग्वाही दिल्यानंतर शिक्षकांनी आपले आंदोलन मागे घेतले
सोपान खंडेराव बोरसे (५२ रा, वजीरखेडे) हे शाळेच्या कार्यालयातच हृदयविकाराच्या झटका येऊन मृत्युमुखी पडलेल्या प्राध्यापकाचे नाव आहे आज सकाळी मुन्सिपल जूनियर कॉलेज मध्ये अकरावी व बारावीच्या परीक्षा सुरू असताना नाशिक पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी निलेश पाटोळे यांच्यासह चार अधिकाऱ्यांचे पथक शाळेत चौकशीसाठी दाखल झाले होते या पथकातील अधिकाऱ्यांनी शिक्षकांशी अरेरावीने बोलून त्यांना उद्धट वागणूक दिली तसेच चौकशीसाठी पुन्हा प्राध्यापक सोपान बोरसे यांना तातडीने पाचारण करण्याचे निर्देश दिले त्यामुळे वर्गात परीक्षा घेत असलेले बोरसे पळतच कार्यालयात पथकासमोर गेले असता तिथेच त्यांना मानसिक तणावामुळे हृदयविकाराचा झटका येऊन ते कार्यालयात कोसळले उपस्थित शिक्षकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले चौकशी अधिकाऱ्यांच्या दडपशाहीमुळेच प्राध्यापक बोरसे यांचा मृत्यू झाल्याचा आरोप ठिय्या आंदोलन करणाऱ्या शिक्षक व प्राध्यापकांनी केला
म्युनिसिपल हायस्कूल जुनिअर कॉलेजची यापूर्वी शिक्षणाधिकारी दिग्रसकर यांनी चौकशी केली आहे चौकशी दरम्यान आवश्यक सर्व कागदपत्रे अधिकाऱ्यांना देण्यात येऊन शिक्षक चौकशीसाठी सहकार्य देखील करत आहेत मात्र चौकशीच्या नावाखाली पुन्हा पुन्हा पथक पाठवून शिक्षकांना मानसिक त्रास अधिकाऱ्यांतर्फे दिला जात आहे प्राध्यापक बोरसे यांची चार वेळा चौकशी केली गेली होती तरी देखील त्यांना चौकशीसाठी बोलवले गेले अधिकाऱ्यांतर्फे त्यांना मानसिक त्रास दिला जात असल्यानेच आज त्यांचा मृत्यू झाला आहे त्यामुळे हा त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांवर व हे कृत्य करण्यास भाग पाडणाऱ्यांवर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अन्यथा प्राध्यापक शिक्षक संघटनांतर्फे आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी आंदोलन करणाऱ्या शिक्षकातर्फे देण्यात आला




