Friday, April 25, 2025
Homeक्राईमजास्त नफ्याच्या आमिषाने साडेदहा लाखांची फसवणूक

जास्त नफ्याच्या आमिषाने साडेदहा लाखांची फसवणूक

नेवाशाच्या व्यक्तिची फिर्याद, सायबर पोलिसांत गुन्हा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

टेलिग्रामद्वारे गुंतवणुकीवर जास्त नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून एकाचे साडेदहा लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. 9 ते 11 डिसेंबर दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी प्रकाश कुमार घुरण कश्यप (हल्ली रा. कुकाणा, नेवासा, मूळ रा. मधुबनी, बिहार) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

9 डिसेंबर ते 11 डिसेंबर दरम्यान प्रकाश कुमार यांना ऐश्वर्या व क्रिस्ता या दोन टेलिग्राम आयडी धारकांकडून गुंतवणुकीवर जादा परतावा देण्याचे आमिष दाखवून आर्थिक व्यवहार करण्यास भाग पाडले. त्यांच्याकडून साडेदहा लाख रुपये घेऊन ते परत न करता, त्यांची फसवणूक केली. सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर हे करत आहेत.

दरम्यान, ऑनलाईन गुंतवणूक करून फसवणूक होण्याच्या घटना वारंवार घडत असतानाही नागरिकांकडून कोणतीही खातरजमा न करता आमिषाला बळी पडून लाखो रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. नागरिकांनी खात्री केल्याशिवाय अशाप्रकारे गुंतवणूक करू नये, आर्थिक व्यवहार करताना दक्षता घ्यावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...