Thursday, March 13, 2025
Homeनाशिकप्रकल्पग्रस्तांची ५० टक्के जागेवर होणार नियुक्ती

प्रकल्पग्रस्तांची ५० टक्के जागेवर होणार नियुक्ती

देवळाली कॅम्प | Deolali Camp

महाजनकोने (Maharashtra State Power Generation Company) आपल्या तिन्ही कंपन्यांमध्ये प्रकल्पग्रस्तांना सामावून घेताना पन्नास टक्के जागा राखीव ठेवाव्यात व त्याबाबतचा अहवाल (Report) येत्या सात दिवसात सादर करावा, असे आदेश ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Energy Minister Nitin Raut) यांनी महाजनको च्या अधिकाऱ्यांना दिली असल्याची माहिती आमदार सरोज अहिरे (MLA Saroj Ahire) यांनी दिली…

- Advertisement -

एकलहरे (Eklahare) येथील प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न गेल्या काही वर्षापूर्वी प्रलंबित असून प्रकल्पग्रस्तांना महाजनकोच्या महानिर्मिती, महापारेषण व महावितरण (Mahavitran) या तिन्ही कंपन्यांमध्ये 50 टक्के आरक्षण (Reservation) देऊन नियुक्ती देऊन महावितरण वगळता इतर कंपन्यांनी कौटुंबिक विमा पॉलिसी (Insurance policy) राबवावी अशी मागणी आ. अहिरे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली होती, गेल्या तीन महिन्यात यासाठी तीन बैठकाही घेण्यात आल्या होत्या.

मंत्रालयात झालेल्या बैठकीत प्रसंगी आ. आहिरे यांनी एकलहरे प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या अतिशय रास्त असून त्यांना न्याय देणे गरजेचे असल्याचे मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी सरकारची देखिल हीच भूमिका असून याबाबतचे आदेश महाजनकोला देण्यात येतील.

तसेच या विभागात लवकरच मेगा भरती काढणार आहे. चतुर्थ श्रेणी अंतर्गत अर्धकुशल प्रशिक्षणार्थींना तिन्ही कंपन्यांमध्ये सामावून घेण्याचा अहवाल लवकरच सादर करण्यासोबत कौटुंबिक विमा पॉलिसी बाबत लवकरच निर्णय घेतला जाईल, अकुशल प्रशिक्षणार्थींनी प्रशिक्षण काळात आयटीआयची पदवी घेतली त्यांना कुशल कामगार म्हणून सामावून घेतले जाईल.

यावेळी कोटमगावचे सरपंच बाळासाहेब म्हस्के, कृती समितीचे पदाधिकारी, अध्यक्ष समाधान लोणे, मनोज नेहे, किरण पेखळे, मोहन मस्के, सुरज म्हस्के आदी उपस्थित होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik Crime : तोतया पोलिसांची बनवेगिरी; वृद्धांचे चार लाख रुपयांचे दागिने...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शहरात तोतया पोलिसांनी (Fake Police) वृद्धांसह ज्येष्ठांना लक्ष करीत त्यांच्याकडील सोन्याचे दागिने (Gold Ornaments) पळवून नेल्याच्या घटना मंगळवारी (दि.११) सकाळच्या...