Saturday, May 4, 2024
Homeनाशिकशिक्षकांचे प्रश्न आठ दिवसांत साेडवणार

शिक्षकांचे प्रश्न आठ दिवसांत साेडवणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांची भेट घेतली. विविध शैक्षणिक विषयावर चर्चा केली. प्रवीण पाटील यांची उपसंचालक पदी प्रभारी म्हणून निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष के. के. आहिरे यांनी स्मरणिका देऊन त्यांचे स्वागत केले. तसेच करोनाचे संकट असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर मुख्याध्यापक यांना बोलावण्यात आले नाही परंतु सेवानिवृत्त झालेल्या सेवकांच्या फाईल अनेक दिवसापासून शिक्षणाधिकारी कार्यालयात पडून आहे. त्यासंदर्भात कार्यालयाने दोन-चार दिवसात सर्व फाईल मार्गी लावण्याची आश्वासन दिले.

- Advertisement -

ज्यांना मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक ‘ पर्यवेक्षक म्हणून पदोन्नती दिलेली आहे, अशा शिक्षकांची मान्यता प्रस्ताव त्वरित मागून त्यांना मान्यता देण्यात यावी .निवडश्रेणी वरिष्ठ वेतन श्रेणी मेडिकल बिल असे वेगवेगळ्या फाईल कार्यालयांमध्ये अनेक दिवसांपासून पडून आहेत. या सर्व फाईल आठ दिवसांमध्ये मार्गी लावण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.

त्याचबरोबर करोनाचे सावट कमी झाल्यानंतर लवकरच मुख्याध्यापकांची स्वतंत्र बैठक घेऊन त्यांचे असलेले वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचं काम केले जाईल, असेही त्याांनी सांगितले. विनाअनुदानित वरून अनुदानित वर झालेल्या बदल्यांना मान्यता देऊन सदर सेवकांचे पगार त्वरित चालू करण्यात यावे, अनेक वेळा बरेच शिक्षक कार्यालयात येतात. परंतु , त्यांना करोनाचे नाव सांगून त्यांना परत पाठविले जाते. त्यामुळे जिल्ह्यातून भरपूर तक्रारी मुख्याध्यापक संघाकडे आल्या होत्या.

याबाबत आलेल्या सर्व सेवकांना सन्मानाची वागणूक देऊन त्यांचे काम त्वरित करून द्यावे, असे पाटील यांनी सांगितले. बैठक नसताना अनेक विषयावर चर्चा करून शिक्षणाधिकारी पाटील यांनी सहकार्य केले. ऑनलाईन शिक्षण प्रणालीमध्ये अनेक अडचणी विद्यार्थी पालक आणि शिक्षक यांना येत आहे. याबाबतही पाटील यांच्याबरोबर चर्चा करण्यात आली.इतक्यात शाळा सुरू करण्याची परिस्थिती नाही. यावरही चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी मुख्य मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष के.के. आहिरे , कार्याध्यक्ष साहेबराव कुटे , उपाध्यक्ष पुरुषोत्तम रकिबे तसेच शिक्षक दशरथ जारस , त्रंबक मार्कंड उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या