Saturday, July 27, 2024
Homeनगरप्रॉपर्टीच्या वादातून जावयाने संपवले सासूला

प्रॉपर्टीच्या वादातून जावयाने संपवले सासूला

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

न्यायालयात पोटगीची केस दाखल केल्याच्या रागातून जावयाने सासूचा खून करून मृतदेह पोत्यात घालून सितेवाडी फाटा ते जुन्नर रस्त्यावरील गणेशखिंड (ता. जुन्नर, पुणे) येथील दरीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लताबाई अरुण कडव (वय 70 रा. शिवाजीनगर, कल्याण रस्ता) असे मयत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात जावई बाळू तुकाराम विधाते (रा. शिवाजीनगर, कल्याण रस्ता) याच्याविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करत तपासकामी नगर तालुका पोलिसांकडे वर्ग केले आहे.

- Advertisement -

याप्रकरणी मयत कडव यांचे दुसरे जावई अण्णा ढेरे (वय 51 रा. बोल्हेगाव फाटा, नगर) यांनी फिर्याद दिली आहे. लताबाई व त्यांचा जावई बाळू हा पत्नी मुलाबाळांसह शिवाजीनगर, कल्याण रस्ता परिसरात राहतात. बाळू व त्याची पत्नी मिना यांचे लताबाई यांच्याशी मागील काही दिवसांपासून वारंवार वाद होत होते. याप्रकरणी लताबाई यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली आहे. दरम्यान, 30 ऑगस्ट रोजी लताबाई या त्यांचे मानलेले भाऊ शिवाजी काळे (रा. हिवरेझरे ता. नगर) यांना राखी बांधण्यासाठी त्यांच्या घरी गेल्या होत्या. त्या 31 ऑगस्ट रोजी काळे यांच्या जवळच्याच शेतात रूईची पाने तोडण्यासाठी गेल्या असता तेथून बेपत्ता झाल्या होत्या.

दरम्यान, त्यांचा परिसरात शोध घेतला असता काळे यांच्या शेतातील रूईच्या झाडाजवळ लताबाई यांचा चष्मा व पायातील चप्पल व प्लास्टिकची गोणी तसेच फुटलेल्या बांगड्यांचे काचेचे तुकडे आढळून आले. तीन दिवस लताबाई यांचा शोध घेतल्यानंतरही त्या मिळून न आल्याने अखेर 4 सप्टेंबर रोजी नगर तालुका पोलीस ठाण्यात मिसींगची तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांकडून लताबाई यांचा शोध सुरू असताना त्यांचा खून झाल्याचे समोर आले आहे. त्यांचा जावई बाळू तुकाराम विधाते याने सासू लताबाईचा खून केल्याची कबुली दिली आहे. त्याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण करीत आहेत.

मृतदेह फेकला दरीत

लताबाई बेशुध्द होताच तिला बाळूने त्याच्या तवेरा गाडीच्या डिक्कीमध्ये टाकले. गाडी सितेवाडी फाटा येथून जुन्नर रस्त्याने गणेशखिंड येथे आणली. मृतदेह पोत्यात भरून झाडाझुडुपातील दरीत ते पोते फेकून दिले. पोलिसांनी विधाते याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने सर्व घटनाक्रम सांगितला. पोलिसांनी त्याला गणेशखिंडीच्या दरीत नेले. तेथे लताबाई हिचा मृतदेह पोत्यात बांधलेला आढळून आला.

असा केला खून

लताबाई या नगर शहरातील दिल्लीगेट येथील शनी मंदीरासमोर पानफुले, रूईची पाने विक्री करत होत्या. त्यांचा जावई देखील तेथेच पानफुले, रूईची पाने विक्री करतो. दरम्यान, 31 ऑगस्ट रोजी लताबाई हिवरेझरे येथे काळे यांच्या शेतात रूईची पाने आणण्यासाठी गेल्या होत्या. तेथे जावई बाळूही आला. त्यांच्यात पोटगीची केस केल्याच्या कारणातून वाद झाला. या वादातून बाळूने लताबाई यांचा डोक्यात लाकडी दांडा घालून खून केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या