Friday, June 14, 2024
Homeभविष्यवेधसांपत्तिक भरभराट होईल

सांपत्तिक भरभराट होईल

सौ. वंदना अनिल दिवाणे

- Advertisement -

नोव्हेंबर – २०२३

महिन्याच्या सुरुवातीला राशीच्या तृतीयस्थानी प्लूटो, चतुर्थात शनि, पंचमात नेपच्यून, षष्ठात गुरु-राहूल-हर्शल, नवमात रवि, लाभात शुक्र, व्ययात मंगळ-बुध-केतू अशी ग्रहस्थितीे आहे.

तुमची रास – राशीची आद्याक्षरे तो, ना,नी, नू,ने, नो, या,यी,यू अशी आहेत. राशीचे चिन्ह विंचू आहे. राशी स्वामी मंगळ आहे. उत्तर दिशा फायद्याचे आहे. राशीचे लिंग स्त्री आहे. म्हणून स्वभाव सौम्य आहे. वर्ण-ब्राह्मण, कफ प्रवृत्ती, पाठीसंबंधी आजार संभवतात. शुभ रत्न- पोवळे, शुभ रंग-लाल, शुभ वार-मंगळवार, देवता-शिव, हनुमान, भैरव. शुभ अंक-९, शुभ तारखा- ९/१८/२७. मित्रराशी- कर्क, मीन. शत्रुराशी-मेष.सिंह,धनु. क्षमा करणार नाही. सूड घेण्याची वृत्ती. संधी मिळताच शत्रुवर वार करील. मात्र प्रिय व्यक्तीच्या संरक्षणासाठी प्राण पणाला लावण्याची तयारी.रसायने, ओषधी, डॉक्टर्स साठी चांगली रास, दृढप्रतिज्ञ, साहसी, कर्मठ.

भाग्यातील रविमुळे जनमानसात चांगली प्रतिमा तयार होईल. नावलौकीक वाढेल. बाहेर उदो उदो होईल. घरच्यांना त्याचा आनंद वाटण्याऐवजी ते उत्साह भंग करण्याचा प्रयत्न करतील. माता पित्याशी म्हणावे तसे पटणार नाही. विचारातील जनरेशन गॅपमुळे एकमेकांचे विचार पटणार नाहीत.

स्त्रियांसाठी – महिलांना पतिराजांचे उत्तम सहकार्य प्राप्त होईल. मात्र कलह टाळण्यासाठी नम्रपणाचे पथ्य पाळणे चातुर्याचे ठरेल. उत्साह चांगला राहील. कलाकौशल्यात प्रगती होईल.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या दृष्टीने चांगला काळ आहे. एकाग्रता साध्य होईल. परिक्षेसाठी त्याचा चांगला उपयोग होईल. खेळ व टी.व्ही. कडे तूर्त दुर्लक्ष करणे भविष्याच्यादृष्टीने फायद्याचे राहील.

शुभ तारखा – १, २, ३, ५, १२, १४, १५, १६, १८, २१, २२, २५, २८, २९

डिसेंबर – २०२३

महिन्याच्या सुरूवातीला राशीस्थानी रवि-मंगळ, द्वितीयात बुध, तृतीयात प्लुटो, चतुर्थात शनि, पंचमात राहू-नेपच्यून, षष्ठात गुरू-हर्शल,व्ययात शुक्र अशी ग्रहस्थिती आहे.

राशीच्या धनस्थानातील बुध सांपत्तिक भरभराट प्राप्त करून देतो. कमिशन बेसिसवर चालणारे धंदे, सल्ला देणे, लेखन, प्रकाशन यापासून धनप्राप्ती होईल. धनसंग्रह करण्यास हा महिना चांगला आहे. बचत शक्य होईल. मात्र सध्याच्या काळातील संस्थातील अनिश्‍चितता पाहून योग्य व सुरक्षित सरकारी बँका अथवा तत्सम वित्त संस्थातूनच गुंतवणूक करणे शहाणपणाचे ठरेल. अभ्यास केल्यास वक्तृत्व कलेमध्ये उत्तम प्रगती करू शकाल. राजकारणात आलेल्यांना याचा विशेष फायदा घेता येईल. धनप्राप्ती स्वतःच्या पराक्रमानेच होईल. कोणापुढे हात पसरावा लागणार नाही. प्रवासात आपले सामान व पैसे चोरीला जाऊ नये याची काळजी घ्यावी. वाचून पाहिल्याशिवाय कोणत्याही कागदावर सही करू नये.

स्त्रियांसाठी – द्वादशात शुक्र आहे. महिलांना म्हटले तर चांगला. म्हटले तर वाईट. सरळ मार्गाने संसार करणार्‍या महिलांसाठी चांगला आहे. मार्गापासून विचलित होणार्‍या महिलांसाठी त्रासदायक आहे.

विद्यार्थ्यांसाठी – विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साध्य होईल. कमी श्रमात आर्थिक प्रगती होईल. आळस टाळावा. गेलेले दिवस परत येत नाहीत.

शुभ तारखा – १, २, ५, ६, ७, ८, १४, १५, १७, १८, २१, २५, २७, ३१

जानेवारी – २०२४

महिन्याच्या सुरुवातीला राशीस्थानी रवि-मंगळ,द्वितीयात बुध, तृतीयात प्लुटो, चतुर्थात शनि, पंचमात राहू-नेपच्यून, षष्ठात गुरू-हर्षल, लाभात शुक्र-केतू अशी ग्रहस्थिती आहे.

षष्ठस्थानी गुरू आहे. या स्थानातील गुरू चांगला नाही असे समजले जाते. त्याचे कारण म्हणजरे मनुष्य बलहीन होतो. शत्रू जिंकण्याची शक्यता आहे. मात्र वैद्यकीय धंद्याला हा गुरू फार पोषक आहे. सार्वजनिक प्रश्‍नांची चर्चा करणे फार आवडेल. नोकर वर्गालाही हा गुरू विशेष चांगला आहे. नोकरीमध्ये पदोन्नती होण्याची किंवा इच्छित स्थळी बदली होण्याची शक्यता आहे. शरीर स्थूल होण्याची शक्यता आहे. तसे होऊ नये म्हणून नियमीतपणे हलका व्यायाम करावा. प्रकृती निरोगी राहील. मात्र पचनाच्या किरकोळ तक्रारी चालू राहतील.

पंचमात राहू आहे. संततीपासून सौख्य मिळणे सध्याच्या कलीयुगात कठीण आहे. अशी अनेकांची धारणा आहे. तुमच्या बाबतीत याचा विशेष अनुभव येण्याची शक्यता आहे. स्त्री वर्गाला स्वास्थ्य हानी होऊन काही ना काही विकारांना तोंड द्यावे लागेल.

स्त्रियांसाठी – चतुर्थस्थानी असलेला शनी महिलांसाठी विशेष चांगला नाही. स्वयंरोजगारातून आर्थिक उत्पन्नात वाढ करावी. म्हणजे खर्चास कठीण जाणार नाही. वाढत्या खर्चांमुळे घरातील खर्चाचे बजेट सांभाळणे कठीण जाईल.

विद्यार्थ्यांसाठी-तीक्ष्ण बुध्दीमत्ता व उत्तम स्मरणशक्ती यामुळे अभ्यासात प्रगती होईल. वार्षिक परीक्षा देणे अवघड वाटणार नाही. या महिन्यात लेखनाचा सराव करावा.

शुभ तारखा – १, २, ५, ६, ८, १४, १५, १७, १८, २१, २५, २७, ३१

- Advertisment -

ताज्या बातम्या