Thursday, August 13, 2026
Homeब्रेकिंग न्यूजनाशिक-त्र्यंबकेश्वर येथील आखाडयांव्यतिरिक्त धार्मिक संस्थाच्या विकासासाठी प्रस्ताव मागविले

नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील आखाडयांव्यतिरिक्त धार्मिक संस्थाच्या विकासासाठी प्रस्ताव मागविले

नाशिक, दि. 12 ऑगस्ट (जिमाका वृत्तसेवा):

- Advertisement -

सिंहस्थ कुंभमेळा-2027 च्या अनुषंगाने नाशिक शहरातील 3 व त्र्यंबकेश्वर येथील 10 प्रमुख आखाड्यांव्यतिरिक्त असणाऱ्या संस्था, महंत, आश्रम, मंदिरे, संस्थाने व धार्मिक संस्थांच्या पायाभूत सुविधांच्या विकासासाठी प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. संबंधित संस्थांनी आवश्यक पायाभूत सुविधांची माहिती सादर करून प्रस्ताव 15 सप्टेंबर 2026 पर्यंत कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रोहितकुमार राजपूत यांनी केले आहे.

सदर ठिकाणांची निवड करताना संबंधित संस्था किंवा ठिकाण नोंदणीकृत आहे किंवा नाही. त्याचे नोंदणीचे स्वरूप, सदर ठिकाण नाशिक जिल्ह्यातील आहे किंवा जिल्ह्याबाहेरील आहे, कुंभमेळ्याच्या पर्वणी काळात त्याचा होणारा प्रभाव, उपलब्ध निवासव्यवस्था व इतर पायाभूत सुविधा, आवश्यक असलेल्या सुविधांचा तपशील आदी बाबींचा विचार करण्यात येणार आहे. तसेच संबंधित ठिकाणी पर्वणी काळात तसेच नियमितपणे भेट देणाऱ्या व निवास करणाऱ्या भाविकांची अंदाजित संख्या विचारात घेतली जाणार असून मागील सिंहस्थ कुंभमेळा २०१५च्या कालावधीत झालेल्या गर्दीच्या संदर्भात सिंहस्थ कुंभमेळा. २०२७साठी अपेक्षित भाविकसंख्येचा अंदाज निश्चित करण्यात येणार आहे. संबंधित स्थळांचे ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व तसेच पर्वणी काळात येणाऱ्या जनसमुदायाच्या दृष्टीने त्या ठिकाणी उपलब्ध होणाऱ्या पायाभूत सुविधांचा उपयोग आपत्कालीन परिस्थितीत करता येईल का, त्याचे भौगोलिक, स्थानिक व धोरणात्मक महत्त्व आदी बाबींचाही विचार करण्यात येणार आहे.

पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रस्तावित जागा संबंधित ट्रस्ट, आश्रम किंवा संस्थेच्या मालकीची असणे आवश्यक असून जागेच्या मालकीबाबत कोणताही न्यायालयीन वाद नसणे अपेक्षित आहे. सदर कामांना आवश्यकतेनुसार नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणामार्फत प्रशासकीय मान्यता देण्यात येईल. मंजूर कामांचे आदेश संबंधित अंमलबजावणी यंत्रणेला देण्यात येतील. त्यानंतर निविदा प्रक्रिया व अन्य आवश्यक कार्यवाही पूर्ण करून कामे निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित कार्यान्वयीन यंत्रणेची राहणार आहे. या कामांसाठी निधी उपलब्ध करून देताना नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा प्राधिकरणामार्फत मंजूर करण्यात येणाऱ्या अन्य कामांसाठी लागू असलेली कार्यपद्धतीच अनुसरण्यात येणार आहे. या प्रक्रियेसाठी स्थानिक पातळीवर समित्यांची रचना करण्यात आली असून नाशिक महानगरपालिका क्षेत्रातील कामांसाठी संबंधित महानगरपालिका, पोलीस, महसूल, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा, एमएसआयडीसी व कुंभमेळा प्राधिकरणातील अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती कार्यरत राहणार आहे. नाशिक जिल्ह्यातील इतर ठिकाणांसाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली समिती कार्यवाही करणार आहे.

सर्व धार्मिक संस्था, मंदिरे, आश्रम व हितसंबंधीत यांना याद्वारे आवाहान करण्यात येते त्याबाबतचे प्रस्ताव या कार्यालयास 15 सप्टेंबर 2026 पावेतो सादर करावेत.

ताज्या बातम्या

नदीजोड प्रकल्पाचे काम लवकरच सुरु होणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची...

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai एकात्मिक जल व्यवस्थापनाच्या माध्यमातून राज्यातील सर्व भाग दुष्काळमुक्त करण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबविण्यात येणार आहे. नदीजोड प्रकल्पाला केंद्रीय जल आयोगाची मान्यता मिळाल्यानंतर...