Monday, June 24, 2024
Homeनगरवेश्या व्यवसाय चालणार्‍या बाभळेश्वरच्या हॉटेलवर छापा

वेश्या व्यवसाय चालणार्‍या बाभळेश्वरच्या हॉटेलवर छापा

लोणी |वार्ताहर| Loni

- Advertisement -

पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून बाभळेश्वर येथील हॉटेल साईप्रसादवर चालणार्‍या वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश केला तर एका परप्रांतीय पीडित महिलेची सुटका केली.

बाभळेश्वर-राहाता या महामार्गालगत असलेल्या हॉटेल साईप्रसाद येथे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्या सुचनेनुसार छापा टाकण्याची योजना आखण्यात आली. त्यासाठी बनावट ग्राहक पाठवून पोलिसांनी सापळा लावला. हॉटेलमध्ये पश्चिम बंगाल राज्यातील एक महिला होती. गिर्‍हाईक म्हणून पाठवलेल्या व्यक्तीला हॉटेल चालकाने रूम आणि इतर साहित्याची व्यवस्था केली.

पोलिसांनी अचानक छापा टाकून पीडित महिलेची सुटका तर केलीच पण कुंटणखाना चालवण्याचे साहित्य आणि आरोपीला ताब्यात घेतले. हॉटेल चालक दीपक बाबासाहेब थोरात, रा. कोल्हार बुद्रुक यास ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध गुन्हा रजिस्टर नं. 554/23 अनैतिक व्यापारास प्रतिबंध कलम 3, 4, 5, 7, 8 नुसार संगीता भानुदास नागरे, लोणी पोलीस ठाणे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला. उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, सपोनि युवराज आठरे यांनी घटनास्थळी पोहचून कायदेशीर बाबींसाठी पोलिसांना सूचना दिल्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या