Friday, April 25, 2025
Homeनगरवेश्याव्यवसायासाठी अल्पवयीन मुलीचा वापर

वेश्याव्यवसायासाठी अल्पवयीन मुलीचा वापर

सोलापूर रस्त्यावरील हॉटेलवर कॅम्प पोलिसांचा छापा

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या पथकाने नगर-सोलापूर रस्त्यावरील वाकोडी फाटा येथे असलेल्या हॉटेल साई श्रध्दा येथे छापा टाकत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला. या कारवाईत दोन पीडित महिलांची तसेच एका अल्पवयीन मुलीची सुटका करण्यात आली असून मुख्य सूत्रधारास अटक करण्यात आली आहे. शहानवाज वहाब आलम हुसेन (रा. तपोवन रस्ता, अहिल्यानगर, मुळ रा. गरगलीया, ता. ठाकुरगंज, जि. किसनगंज, बिहार) असे अटक केलेल्या सूत्रधाराचे नाव आहे. रविवारी (23 फेब्रुवारी) सायंकाळी 5 वाजता काही स्थानिक नागरिकांनी हॉटेल साई श्रध्दा येथे देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून एका इसमाला मारहाण केल्याची माहिती कॅम्प पोलिसांना मिळाली.

- Advertisement -

यानंतर सहायक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांना माहिती दिली. यावेळी निरीक्षक दराडे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक मुलगीर व त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे, अकोलकर, पालवे, घोडके, डोळे, शिंदे, टकले, शाहीद शेख, प्रमोद लहारे, महिला अंमलदार कांबळे यांनी सदर हॉटेलवर छापा टाकला. यावेळी हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत महिलांना बळजबरीने देहविक्रीसाठी ठेवण्यात येत असल्याचे आढळले. पोलिसांनी त्वरित कारवाई करत दोन पीडित महिलांची आणि एका अल्पवयीन मुलीची सुटका केली.

शहानवाज वहाब आलम हुसेन यास अटक करण्यात आली. त्याने महिलांना फसवून आणत त्यांच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेतल्याची कबुली दिली. भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 96 सह पोस्को कायद्याच्या कलम 4, 8, 12 तसेच स्त्रिया व मुलींच्या अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा 1956 अंतर्गत कलम 3, 4, 5, 6, व 7 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...