Saturday, May 30, 2026
Homeक्राईमCrime News : वेश्याव्यवसायला विरोध केल्याने रूईछत्तीशीतील वाद चिघळला

Crime News : वेश्याव्यवसायला विरोध केल्याने रूईछत्तीशीतील वाद चिघळला

दोन गटांत हाणामारी || परस्परविरोधी फिर्यादीवरून गुन्हे दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

रूईछत्तीशी (ता. अहिल्यानगर) शिवारातील वेश्याव्यवसाय बंद करण्यासाठी गेल्या एक महिन्यापूर्वी ग्रामस्थांनी उपोषण केले होते. त्यानंतर पोलिसांनी गावातील अवैध व्यवसाय बंद केले. दरम्यान, यातून गावात सुरू झालेला वाद चिघळत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये मारहाण, जातीवाचक शिवीगाळ झाल्याचे समोर आले आहे. या दोन्ही घटनांप्रकरणी महिनाभरानंतर अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल झाले आहेत.

पहिल्या घटनेत, काही दिवसांपूर्वी एका प्रकरणाबाबत तक्रार दिल्याच्या रागातून रूईछत्तीशी येथील 43 वर्षीय महिलेला व तिच्या मुलाला 3 फेब्रुवारीला लक्ष्य केल्याचे समोर आले आहे. गणेश राजेंद्र शिंदे, रवींद्र संतोष शिंदे, सागर नामदेव जगदाळे आणि उमेश कुटे (सर्व रा. रूईछत्तीशी) यांनी पीडित महिलेच्या घरासमोर जाऊन तिला व तिच्या मुलाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. तसेच मुलाला मारहाण केली. महिला मध्यस्थी करण्यासाठी पुढे आली असता तिलाही जोरात ढकलून देण्यात आले. तसेच दोघांनाही जिवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. पोलिसांनी महिलेच्या फिर्यादीवरून चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, याच पार्श्वभूमीवर त्याच परिसरात रात्रीच्या वेळी आणखी एक प्रकार घडला. वेश्या व्यवसायाला विरोध केल्याच्या कारणावरून काही तरूणांना अडवून मारहाण करून त्यांच्याकडील रोख रक्कम लुटल्याची घटना घडली. यासंदर्भात सागर नागदेव जगदाळे यांनी फिर्याद दिली आहे. ते आपल्या साथीदारांसह जात असताना गणेश देवराम छत्तीसे, प्रशांत देवराम छत्तीसे, निर्मला देवराम छत्तीसे, शोभा दिलीप गोरे, अभिजीत दिलीप गोरे, दिलीप दत्तात्रय गोरे, जुबेर नसीर शेख आणि गणेश उर्फ भैय्या संपत गोरे (सर्व रा. रुईछत्तीशी) यांनी संगनमताने सागर जगदाळे यांचे वाहन अडवून त्यांना खाली ओढले. या वेळी प्रशांत छत्तीसे याने हातातील दांडक्याने फिर्यादीला मारहाण केली तसेच त्यांच्या खिशातील सुमारे 20 हजार रूपये बळजबरीने काढून घेतल्याचा आरोप आहे.

ताज्या बातम्या

कांदा उत्पादकांच्या प्रश्नावर महाविकास आघाडी आक्रमक; २ जूनला पुणे – नाशिक...

0
मुंबई | प्रतिनिधी Nashik कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आणि केंद्र सरकारवर दबाव वाढवण्यासाठी मंगळवार २ जून रोजी महाविकास आघाडीतर्फे आणखी एक मोर्चा काढला...