Friday, January 23, 2026
HomeनगरShirdi : संरक्षण उत्पादनाचे महत्वपूर्ण केंद्र म्हणून अहिल्यानगरचे नाव जगासमोर येणार

Shirdi : संरक्षण उत्पादनाचे महत्वपूर्ण केंद्र म्हणून अहिल्यानगरचे नाव जगासमोर येणार

शिर्डी औद्योगिक वसाहतीत संरक्षण प्रकल्पाची सुरुवात

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेतून देशाच्या संरक्षण उत्पादनाचे महत्वपूर्ण केंद्र म्हणून भविष्यात अहिल्यानगरचे नाव जगासमोर येणार असून संरक्षण क्षेत्रात प्रगती साध्य करणार्‍या गणेश निबे यांच्या उद्योग समूहाचे योगदान यामध्ये महत्वपूर्ण राहील, असे प्रतिपादन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. शिर्डी औद्योगिक वसाहतीमध्ये निबे गृपने विकसित केलेल्या संरक्षण उत्पादनाच्या प्रकल्पामध्ये मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि शालिनीताई विखे पाटील यांच्या उपस्थितीत कामाची औपचारीक सुरूवात करण्यात आली.

- Advertisement -

महंत बापूजी, आ. आशुतोष काळे, डॉ. सुजय विखे पाटील, नगराध्यक्षा जयश्री थोरात, उपनगराध्यक्ष अभय शेळके, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर आदी उपस्थित होते. मंत्री विखे पाटील म्हणाले, निबे गृपच्या माध्यमातून सुरू असलेले संरक्षण उत्पादन हे कल्पनाशक्तीच्या पुढे आहे. परंतु अतिशय जिद्द आणि मेहनतीने या क्षेत्रात गणेश निबे यांनी स्वत:ची निर्माण केलेली ओळख सर्वांसाठी अभिमानाची आहे. औद्योगिक वसाहत निर्माण करताना जागा उपलब्ध झाली. एक वर्षात 12 लाख चौरस मीटर आकाराचे शेड उभे करून त्यामध्ये उत्पादन घेण्यास झालेली सुरूवात हे देशातील पहीले उदाहरण ठरले आहे.

YouTube video player

अतिशय आव्हनात्मक परीस्थितीत गणेश निबे यांनी या क्षेत्रात पाऊल टाकले, पण हा समूह जगाच्या नकाशावर जावून पोहचला याचे एकमेव कारण म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेमुळे. निबे गृपने स्वत:चा सॅटेलाईट विकसित करण्याचे काम सुरू केले आहे. यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी निबे गृपने विकसित केलेले रॉकेट राजपथावरील संचलनात असल्याचा अभिमान आपल्या सर्वाना असल्याचा आवर्जून उल्लेख मंत्री विखे पाटील यांनी केला.
शिर्डीच्या नगरीला जसा अध्यात्मिक वारसा आहे.

तसाच आता संरक्षण उत्पादनाची भूमी म्हणून सुध्दा ओळख होईल असे सांगून, अतिशय दूरदृष्टीने त्यावेळी झालेला विमानतळाचा निर्णय बाळासाहेब विखेंच्या प्रयत्नाने झालेले रेल्वे स्टेशन आणि आता संरक्षण उत्पादनाच्या निर्मितीला शिर्डीत झालेली सुरूवात ही बाबांच्या श्रध्दा आणि सबुरीच्या वचनाची देण आहे. या उद्योगामुळे मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार आहे. स्थानिक भूमिपूत्रांना इथे प्राधान्य असून पहिल्यांदाच 150 कौशल्य प्रशिक्षित युवकांना रोजगार मिळाल्याचे ना. विखे पाटील यांनी सांगितले.

उद्योजक गणेश निबे यांनी शिर्डीत विकसित झालेला प्रकल्प फक्त साईबाबांच्या आशीवार्दाने आणि मंत्री विखे पाटील यांच्या पाठबळानेच उभा करता आला. अवघ्या नऊ महिन्यात झालेले काम पाहण्यास मार्च महीन्यात पाचही सैन्य दलाचे प्रमुख येथे येणार असल्याचे त्यांनी सांगितले. निबे उद्योग समूह जगाला उत्पादन निर्यात करीत आहे. इस्त्राईलला सुध्दा मागे टाकण्याची शक्ती देशात निर्माण झाली असून बारा महिन्याने देशावरील संकटाला सामोरे जाता येईल एवढी उत्पादन क्षमता देशात निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले. याप्रसंगी आ. आशुतोष काळे यांनी मनोगत व्यक्त केले.

दावोस येथील परिषदेत साडेचौदा लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार झाले. यामध्ये अहिल्यानगर जिल्ह्याला मोठी संधी निर्माण करून दिल्याबद्दल मंत्री विखे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन केले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : पोलीस मुख्यालयातील मुद्देमाल कक्षाचा पंचनामा

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पुणे ग्रामीण पोलिसांनी पकडलेला अंमली पदार्थ (ड्रग्ज) स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार शामसुंदर विश्वनाथ गुजर याने अहिल्यानगर येथील पोलीस मुख्यालयातील जप्त मुद्देमाल...