Friday, June 21, 2024
HomeनाशिकNashik News : नाशकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून गोपीचंद पडळकरांविरोधात 'जोडो मारो'

Nashik News : नाशकात राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून गोपीचंद पडळकरांविरोधात ‘जोडो मारो’

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

- Advertisement -

आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्याच्या विरोधात नाशिक शहर व जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करत पडळकरांच्या फोटोला जोडो मारो आंदोलन केले…

आमदार पडळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबाबत केलेल्या चुकीच्या वक्तव्याबाबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत निषेध व्यक्त केला. नाशिक शहरातील राष्ट्रवादी भवन कार्यालयाच्या बाहेर आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या फोटोला जोडे मारत आंदोलन (Agitation) करण्यात आले. तसेच पडळकरांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Parliament Special Session : जुन्या संसदेत फोटो सेशनदरम्यान भाजपा खासदार अचानक बेशूद्ध

यावेळी युवक शहराध्यक्ष अंबादास खैरे, युवक जिल्हाध्यक्ष योगेश निसाळ, चेतन कासव, आदित्य गव्हाणे, संदीप गांगुर्डे, अशोक पाटील, राज रंधवा, अथर्व निसाळ, आशुतोष चव्हाण, आकाश म्हस्के, ज्ञानेश्वर महाले, किरण चौधरी, गणेश हांडोरे, संतोष अढागळे, हर्षल इतापे, गणेश पगार, विकी वाळके, सुयश मेणे, पराग गांगुर्डे, राजेश हाडपे, समाधान महाले यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

Maharashtra Rain Update : गणरायाच्या आगमनावेळी वरुणराजा लावणार हजेरी; ‘या’ जिल्ह्यांमध्ये धो-धो बरसणार

- Advertisment -

ताज्या बातम्या