Saturday, July 27, 2024
Homeजळगावपाचोरा येथे पंजाबमेल, विदर्भ एक्सप्रेसला थांबा न मिळाल्यास आंदोलन!

पाचोरा येथे पंजाबमेल, विदर्भ एक्सप्रेसला थांबा न मिळाल्यास आंदोलन!

पाचोरा – प्रतिनिधी pachora

पाचोरा रेल्वे स्थानकावर (Pachora Railway Station) पंजाबमेल, (Punjabmail) विदर्भ (Vidarbha Express) आणि अन्य मागण्यांसाठी पाचोरा रेल्वे कृती समितीच्या वतीने रेल्वे स्टेशन गेट वर एकदिवसीय धरणे करण्यात आले. रेल्वे प्रशासन, लोकप्रतिनिधींचा बेजादारपणा व पक्षपात, व सापत्न वागणूक भूमिकेच्या विरोधात पाचोरा रेल्वे प्रवासी कृती समितीतर्फे पाचोरा रेल्वे स्टेशन समोर आमरण उपोषणे, धरणे आंदोलन, निदर्शने केली जात आहे.

- Advertisement -

मागील दोन-तीन वर्षापासून पाचोरा रेल्वे प्रवासी कृती समिती पाचोराच्या माध्यमातून पाचोरा शहर तालुका व परिसरातील तीन चार तालुक्याच्या प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीच्या विरोधात पाचोरा रेल्वे कृती समितीतर्फे आंदोलन घेण्यात आले. या आंदोलनामार्फत पाचोरा रेल्वे स्टेशनवर सायंकाळी सहा वाजेनंतर मुंबईला जाण्यासाठी कोणतीही एक्स्प्रेस नाही. त्यासाठी पाचोरा स्टेशनवर पंजाब मेल व विदर्भ एक्सप्रेस या गाड्यांना थांबा देण्यात यावा, देवलाली भुसावळ पॅसेंजर ची वेळ पूर्ववत करण्यात यावी ,कोरोना काळात विस्कटलेल्या रेल्वे वेळापत्रक पूर्ववत करण्यात यावे या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला शहरातून सराफ असोसिएशन, डॉक्टर असोसिएशनच, रिक्षा असोसिएशन डॉक्टर , बार असोसिएशन किराणा असोशियन, पत्रकार संघटना, विद्यार्थी संघटना ग्राहक सेवा संघ, यांनी पाठिंबा दिला. यावेळी माजी आमदार दिलीप वाघ शिवसेना नेत्या वैशालीताई पाटील यांनी ही धरणे आंदोलनाच्या ठिकाणी येऊन पाठिंबा दिला. सदर गाड्या थांबण्या संदर्भात एका महिन्याच्या आत कारवाई न झाल्यास रमागण्या मान्य न झाल्यास रेल्वे कृती समिती तीव्र आंदोलन करणार आहे. आंदोलनामध्ये सर्व स्तरातील शेकडो लोकांनी सहभाग नोंदवला. सदर आंदोलनाचे नेतृत्व पाचोरा रेल्वे प्रवासी कृती समितीचे अध्यक्ष खलील देशमुख, कार्याध्यक्ष ॲड.अविनाशभालेराव, सरचिटणीस सुनील शिंदे, रणजित पाटील, भरत खंडेलवाल, बाजार समितीचे सभापती प्रा.गणेश पाटील, ग्राहक संघटनेचे डी. एफ.पाटील,आनंद नवगिरे, मराठा सेवा संघाचे सुनील पाटील, संजय जडे, पप्पू राजपूत, ॲड.अण्णासाहेब भोईटे, माजी नगरसेवक सनी वाघ, नाना देवरे, शेख रसूल शेख उस्मान, दादाभाऊ चौधरी, दत्ता जडे, खंडू सोनवणे, अशोक मोरे, किशोर डोंगरे, आनंद , डॉक्टर असोसिएशनचे डॉ.दिनेश सोनार, मनीष बाविस्कर, भय्या साळवे, ईश्वर संघवी, राजेंद्र बोथरा, मराठा सेवा संघाचे सुनील पाटील, विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते.

खासदार उन्मेष पाटील यांच्या भूमिके वर नाराजी!

माजी आमदार दिलीप वाघ यांनी रेल्वे कृती समितीच्या एकदिवसीय धरणे आंदोलनाला भेट देतांना सांगितले की जनतेच्या समस्या बाबत लोकप्रतिनिधी म्हणून खासदार उन्मेष पाटील उदासीन असल्याची नाराजी व्यक्त केली. रेल्वे गाड्या थांबविणे त्यांच्या साठी किरकोळ विषय आहे.

तसेच पाचोरा रेल्वे कृती समिती व परिसरातील प्रवाशी संघटना, दैनंदिन प्रवाशी यांच्या अनेक दिवसांपासून पाचोरा रेल्वे स्थानकावर काही विशेष एक्सप्रेस ला थांबे मिळावे लोकप्रतिनिधी, रेल्वे प्रशासनाला निवेदन देणे, आमरण उपोषण, आंदोलने करून पाठपुरावा करीत आहेत. असे असतांना खासदार उन्मेष पाटील यांनी आंदोलकांच्या समस्या जाणून घेतल्या नाही, आंदोलनांना भेट दिली नाही, रेल्वे कृती समितीला वेगवेगळ्या ठिकाणी भेटीला बोलावले असता त्यांची भेट घेतली नाही. चाळीसगाव येथे अनेक गाड्या मागणी नसतांना थांबतात. मग पाचोरा येथे का नाही.? खासदार पाचोरा तालुक्याला सापत्न वागणूक देत आहे. खासदार फक्त चाळीस गांवचेच आहेत का ! असा आरोप पाचोरा रेल्वे कृती समितीचे सर्व सदस्य आणि सरचिटणीस सुनील शिंदे यांनी प्रतिक्रिया देतांना खासदारांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या