आ.मंगेश चव्हाण यांना ठार मारण्यांची धमकी देणार्यांवर कारवाईची मागणी
चाळीसगाव | प्रतिनिधी
चाळीसगाव शहर पोलीस स्टेशन समोर स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे शिवसेना उबाठा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, कॉंग्रेस, आप आदी महाविकास आघाडीच्या वतीने दि,२१ रोजी धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात महाविकास आघाडीचा नेते किसन जोर्वेकर यांनी केलेल्या भाषणात आमदार मंगेश चव्हाण यांना ‘ माझ्या नादी लागशील तर पिस्तुल आणून गोळी घालून टाकेल रस्त्यावर अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे भाजपा व महायुतीतर्फे आदोलनात शामिल सर्वांचे म्हणने आहे. या धमकीच्या निषेधार्थ भाजपा महायुती व तालुक्यातील सर्वसामान्य जनतेच्या वतीने दि,२४ रोजी निषेध म्हणून शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी किसन जोर्वेकर, माजी खासदार उन्मेष पाटील व माजी आमदार राजीव देशमुख यांचा चेहरा असलेला पुतळा आमदार मंगेश चव्हाण यांच्या समर्थकांनी जाळून निषेध केला.
किसन जोर्वेकर याने हे वक्तव्य केले त्यावेळी महाविकास आघाडीचे नेते माजी खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार राजीव देशमुख यांच्यासह चाळीसगाव तालुक्यातील महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. आमदार मंगेश चव्हाण यांना गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिली, तेव्हा यातील अनेकांनी टाळ्या वाजविल्या तसेच हसून दाद दिली. घटनेला आता ४८ तास उलटले तरीदेखील या क्षणापर्यंत माजी खासदार उन्मेष पाटील, माजी आमदार राजीव देशमुख यांच्यासह तेथे उपस्थित एकानेही या वक्तव्याचा निषेध नोंदवला नाही, त्यामुळे सदर धरणे आंदोलन हे पूर्वनियोजित कटाचा भाग असून त्यात मुद्दामहून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या हाफ मर्डर, खंडणी, आदी अनेक गुन्हे दाखल असणार्या व्यक्तीला सहभागी केले गेले व त्यांना मुद्दामहून भाषण करण्याची संधी दिली गेली. म्हणून हा कट रचणार्या उन्मेष पाटील, राजीव देशमुख, धरणे आंदोलन आयोजक राष्ट्रवादी शरद पवार गट तालुकाध्यक्ष दिनेश पाटील, शिवसेना उबाठा गट तालुकाध्यक्ष रमेश चव्हाण व इतर आयोजक पदाधिकारी यांच्यावर देखील प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून गुन्हा दाखल करावा अशी तक्रार भाजपा शहराध्यक्ष नितीन पाटील यांनी पोलिसांकडे केली आहे. पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे हे निवेदन सुपूर्द करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई आठवले गट आदी महायुतीचे पदाधिकारी, आजी माजी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, तरुण, युवक विद्यार्थी,महिला व शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थिती होते.
भाजपा महायुतीतर्फे चाळीसगावात निषेध आंदोलन

ताज्या बातम्या
Shirdi News : शिर्डी विमानतळावरून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाईट लँडीगची गुढी
रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh
कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळावरुन रविवारी 30 मार्चपासून नाईट लँडीग सुरू झाली असून हैदराबादवरुन इंडीगो एअरलाईनचे विमान 56...