Sunday, September 27, 2026
HomeनाशिकNashik News: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आयटकचे धरणे आंदोलन

Nashik News: ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसाठी आयटकचे धरणे आंदोलन

नाशिक | प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ (आयटक) यांच्या आवाहनानुसार, शासन स्तरावर मंजूर झालेल्या मागण्यांची ग्रामपंचायत स्तरावर अंमलबजावणी न झाल्याबाबत तसेच शासन स्तरावर प्रलंबित आर्थिक मागण्यांसाठी आज (८ ऑगस्ट) सकाळी ११:३० वाजेच्या दरम्यान जिल्हा परिषद कार्यालय, नाशिक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन महासंघाच्या २० जुलै २०२५ रोजी सातारा येथे झालेल्या राज्यस्तरीय बैठकीतील निर्णयानुसार आयोजित करण्यात आले. जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायत कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले.

शासन स्तरावर मंजूर असूनही अंमलबजावणी न झालेल्या मागण्या:
-सुधारित किमान वेतनातील ग्रामपंचायत २५% व ५०% हिस्सा त्वरित अदा करावा.
-१ जुलै २००७ पासून लागू असलेला विशेष राहणीमान भत्ता देण्यात यावा.
-निवृत्त कर्मचाऱ्यांना उपदान, अर्जित रजा व इतर सेवा निवृत्ती लाभ मिळावेत.
-मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना अनुकंपा तत्वावर नोकरी द्यावी.
-वेतन अनुदान वेळेत कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यात जमा व्हावे.
-२०१८ पासून थकीत असलेली भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरणा करावी.

- Advertisement -

शासन स्तरावरील प्रलंबित प्रमुख मागण्या:
-अभय यावलकर समितीच्या शिफारसी लागू कराव्यात.
-उर्वरित ३५ महिन्यांचा किमान वेतनातील वाढीव फरक अदा करावा.
-नवीन किमान वेतनासाठी समिती त्वरित गठित करावी.
-वेतनासाठीची वसुली व उत्पन्नाची अट रद्द करावी.
-वेतन पूर्वीप्रमाणे ERP पद्धतीने थेट बँक खात्यात जमा करावे.
-लोकसंख्या व आकृतीबंध अट रद्द करून सर्व कार्यरत कर्मचाऱ्यांना शासन तिजोरीतून वेतन द्यावे.
-राहणीमान भत्ता १००% शासन तिजोरीतून द्यावा.
-१० महिन्यांच्या थकीत वाढीव वेतनरकमेची अदायगी करावी.
-रिक्त पदांची पारदर्शक भरती ज्येष्ठता यादीनुसार करावी.
-उपदानाच्या अटी शिथिल कराव्यात.
-ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर नियमित बैठकांचे आयोजन करावे.

आंदोलनाचे नेतृत्व कॉ. सखाराम दुर्गुडे (जिल्हा अध्यक्ष), कॉ. राजू देसले (राज्य सचिव, आयटक महाराष्ट्र), कॉ. उज्वल गांगुर्डे (सचिव), संतोष गावडे यांनी केले. तसेच सुरेश पवार, विनायक पवार, कैलास गायकवाड, बाळासाहेब ढाकणे, नामदेव पोतिंदे, रमेश भोये, गोरख ठाकरे, दिगंबर बटाल, भाऊसाहेब सोनवणे, किशोर बैरागी, कैलास टिळे, संतोष ठोंबरे, विलास अहिरे, कॉ. भीमा पाटील, कॉ. व्ही. डी. धनवटे, मनोहर पगारे, प्राजक्ता कापडणे, कॉ. दत्तात्रय गायधनी आदींनी मार्गदर्शन केले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Accident News : दोन ट्रकची समोरासमोर धडक; भीषण अपघातात तिघांचा...

0
चांदवड | प्रतिनिधी | Chandwad तालुक्यातील कुंदलगाव शिवारातून जाणाऱ्या मालेगाव-मनमाड मार्गावर (Malegaon-Manmad Highway) शनिवारी (दि. २६) सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन...