Saturday, May 4, 2024
Homeनगरराहाता पालिकेच्या बंद पडलेल्या अग्नीशामक गाडीची पुजा करून प्रशासनाचा निषेध

राहाता पालिकेच्या बंद पडलेल्या अग्नीशामक गाडीची पुजा करून प्रशासनाचा निषेध

राहाता (तालुका प्रतिनिधी) –

राहाता नगरपालिकेच्या बंद असलेल्या अग्नीशामक गाडीची उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे यांनी हार घालुन पुजा करत पालिका प्रशासनाला घरचा आहेर दिला.

- Advertisement -

नागरिकांच्या सेवेसाठी लाखो रूपये खर्च करून घेतलेली अग्नीशामक गाडी दुरूस्तीअभावी गेल्या काही दिवसापासून पालिका कार्यालयासमोर उभी आहे. काल भल्या सकाळी राहाता येथील शेतकरी अमीत गाडेकर यांच्या उसाला आग लागली. पालिकेला फोन केला असता गाडी नादुरूस्त आहे, असे सांगितले. त्यानंतर शिर्डी नगरपंचायत व गणेश साखर कारखान्याच्या गाड्यांनी ती आग विझविली. या दोन्ही गाड्या येईपर्यंत गाडेकर यांचा दोन एकर ऊस जळून लाखो रूपयांचे नुकसान झाले.

याची माहीती मिळताच पालिकेचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, नगरसेवक सागर लुटे, युवा सेनेचे शहरप्रमुख भागवत लांडगे यांनी पालीका कार्यालयाजवळ उभी असलेल्या अग्नीशामक गाडीला हार घालून पुजा करत पालीका प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा निषेध करत घरचा आहेर दिला.

यावेळी पठारे म्हणाले, राहाता पालीका पैसे गोळा करायला एक नंबर आहे. मात्र नागरिकांच्या समस्या सोडविण्यास कायम मागे असते. गेल्या 15 दिवसापासून हे वाहन बंद पडलेले असून अवघ्या एक तासाचे काम असताना पालीका प्रशासन त्याकडे डोळेझाक करते. नागरिकांचे संसार बरबाद झाल्यावर नगरपालीका जागी होणार का असा सवाल त्यानी व्यक्त करत या निष्काळजी पालीकेला जाग कधी येणार पालीका प्रशासन व कर्मचारी यांचा हलगर्जी पणा पुन्हा एकदा समोर आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या