Monday, March 31, 2025
Homeदेश विदेशनागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात राज्यात निदर्शने

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात राज्यात निदर्शने

नागरिक रस्त्यावर; अनेक ठिकाणी हिंसक वळण

मुंबई – नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात राज्यासह देशभरात निदर्शने करण्यात येत आहेत. उत्तर प्रदेश, लखनौ, अहमदाबादमध्ये या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. अनेक ठिकाणी आंदोलकांकडून दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोड केल्याचे प्रकार झाले आहेत. देशभरातील डाव्या संघटनांनी देशभर एल्गार पुकारला आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली. काही ठिकाणी संचारबंदी तर, अनेक मुख्य शहरांत इंटरनेट बंद करण्यात आलं आहे.

- Advertisement -

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात ईशान्य भारत आणि नवी दिल्लीनंतर आता महाराष्ट्रातही आंदोलन सुरु झाले आहे. गुरूवारी मुंबईत बॉलिवूडचे सेलिब्रिटी आणि विविध सामाजिक संघटनांनी एकत्र येत ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानातून कायद्याच्या विरोधात एल्गार पुकारला आहे. मुंबईसह नागपूर, सोलापूर, अहमदनगर, उस्मानाबाद आणि औरंगाबाद येथेही कायद्याचा विरोध करण्यासाठी अनेक लोक रस्त्यावर उतरले आहेत.

बॉलिवूड अभिनेता फरहान अख्तरने दोन दिवसांपूर्वी सोशल मीडियावचा निषेध बस करा आणि आता ऑगस्ट क्रांती मैदानात एकत्र या, असे आवाहन केले होते. त्यानंतर अनेक समविचारी संघटनांनी या आंदोलनाला आपला पाठिंबा दर्शविला. काल ऑगस्ट क्रांती मैदानात शेकडो तरुण, अल्पसंख्यांक समाजाचे बांधव, आंबेडकरी कार्यकर्ते ऑगस्ट क्रांती मैदानात दाखल झाले.

अभिनेत्री हुमा कुरेशी, साकिब हे देखील या आंदोलनात सहभागी झाले. ऑगस्ट क्रांती मैदानात हजारोंच्या संख्येने आंदोलक आल्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. देशात इतर ठिकाणाप्रमाणे मुंबईतील आंदोलन चिघळू नये, यासाठी या परिसरात इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे.

नाशिकच्या मालेगावमध्येही मुस्लीम समाजाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. यावेळी मालेगावमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. नागपूर विधानसभा भवनावरही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात शांततेत मोर्चा काढण्यात आला. याशिवाय मालेगाव, उस्मानाबाद, नाशिक, जळगाव, मनमाड, अमरावतीसह इतर ठिकाणी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात निदर्शनं करण्यात आली.

पुण्यात समर्थनार्थ आंदोलन
देशभरात सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात आंदोलन होत असताना पुण्यात मात्र वेगळं चित्र आहे. पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात कायद्याला समर्थन दर्शवण्यासाठी आंदोलन करण्यात आलं. अखिल भारतीय विद्यापीठ परिषदेतर्फे हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी अनेक विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shirdi News : शिर्डी विमानतळावरून गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर नाईट लँडीगची गुढी

0
रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Rajangav Deshmukh कोपरगाव तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळावरुन रविवारी 30 मार्चपासून नाईट लँडीग सुरू झाली असून हैदराबादवरुन इंडीगो एअरलाईनचे विमान 56...