नाशिक | प्रतिनिधी | Nashik
- Advertisement -
विरासत इंडियन आर्ट अॅण्ड कल्चर सेंटर येथे सुरु करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचा शुभारंभ भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे शिष्य पंडित डॉ. अविराज तायडे यांच्या ‘स्वर विरासत’ या कार्यक्रमाद्वारे करण्यात येणार आहे…
आज शनिवारी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शेरीन मेडोज येथील विरासत इंडियन आर्ट अॅण्ड कल्चर सेंटर येथे सायंकाळी ४.४५ ते ६.३० दरम्यान हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात पंडित डॉ. अविराज तायडे यांना नितीन वारे (तबला), संस्कार जानोरकर (संवादिनी), अमित भालेराव (तालवाद्य) हे साथ सांगत करणार आहेत. कार्यक्रमाला संगीतप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजक संजय पोरवाल व संगीता पोरवाल यांनी केले आहे.