Sunday, June 14, 2026
Homeक्रीडापी.टी. उषा यांच्यावर दुःखचा डोंगर कोसळला, पती व्ही. श्रीनिवासन यांच निधन

पी.टी. उषा यांच्यावर दुःखचा डोंगर कोसळला, पती व्ही. श्रीनिवासन यांच निधन

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारताची सुवर्णकन्या, धावपटू आणि सध्या भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (IOA) अध्यक्षा असलेल्या पी. टी. उषा यांच्यावर दुःखाचा मोठा आघात झाला आहे. त्यांचे पती श्रीनिवासन यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे क्रीडा विश्वात तसेच सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रीनिवासन शुक्रवारी सकाळी आपल्या निवासस्थानी अचानक बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांच्या मोठ्या प्रयत्नांनंतरही श्रीनिवासन यांना वाचवण्यात यश आले नाही.

- Advertisement -

श्रीनिवासन हे पी. टी. उषा यांच्या आयुष्यातील खंबीर आधारस्तंभ होते. उषा यांच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा कारकिर्दीत तसेच निवृत्तीनंतरच्या सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील कामकाजात त्यांनी नेहमीच मोलाची साथ दिली. विशेषतः उषा यांच्या प्रशिक्षण संस्था, क्रीडा प्रशासनातील जबाबदाऱ्या आणि ऑलिम्पिक चळवळीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये श्रीनिवासन यांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरला.

Ajit Pawar Death: मोठी बातमी! अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय; ‘या’ तपास यंत्रणेकडून होणार चौकशी

पी.टी. उषा यांच्या पतीच्या श्रीनिवासन यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी पी.टी. उषा यांना कॉल करुन त्यांच्याशी फोनवर बोलत शोक व्यक्त केला. तसंच पी.टी. उषा यांच्या कुटुंबाप्रती आपल्या संवेदना व्यक्त केल्या. त्याशिवाय केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनीही श्रीनिवासन यांच्या निधनावर दु:ख व्यक्त केलं आहे. किरण रिजिजू यांनी व्ही. श्रीनिवासन यांचा एक फोटो शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

पी. टी. उषा या भारतीय क्रीडा विश्वातील प्रसिध्द व्यक्तिमत्त्व आहेत. १९८४ च्या लॉस एंजेलिस ऑलिम्पिकमध्ये अवघ्या काही सेकंदांनी पदक हुकले असले तरी त्यांनी संपूर्ण देशाला प्रेरणा दिली. त्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धा, राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये त्यांनी भारताचा लौकिक वाढवला. त्यांच्या या यशस्वी प्रवासात कुटुंबाचा, विशेषतः पतीचा आधार नेहमीच महत्त्वाचा राहिला.

श्रीनिवासन यांच्या निधनानंतर क्रीडा क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी, राजकीय नेत्यांनी आणि चाहत्यांनी शोकसंदेश व्यक्त केले आहेत. सामाजिक माध्यमांवरून पी. टी. उषा यांना धीर देण्याचे आणि दिवंगत आत्म्यास श्रद्धांजली अर्पण करण्याचे संदेश येत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime : आयमाच्या माजी पदाधिकाऱ्यावर गुन्हा; खंडणी, अपहरण, मारहाण व...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik आयमाचे माजी खजिनदार गोविंदा झा (Govind Zha) यांच्यासह पाच जणांविरोधात खंडणी, अपहरण, मारहाण आणि फसवणुकीसह विविध गंभीर कलमान्वये एमआयडीसी पोलीस...