सातपूर | प्रतिनिधी | Satpur
गेली चार दशकं आपल्या कार्यकर्तृत्वाने जिल्हाभर आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणारे माजी सभागृह नेते तथा भाजपा प्रदेश निमंत्रित सदस्य दिनकर पाटील यांच्या आजवरच्या कार्याचं प्रतिबिंब मांडणारे ’व्रत सेवेचं’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
भाजपाच्या वसंतस्फूर्ती कार्यालयात या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, आमदार देवयानी फरांदे, माजी आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे, शहराध्यक्ष प्रशांत जाधव, लोकसभा समन्वयक गिरीष पालवे, सरचिटणीस नाना शिलेदार, सुनील केदार, अमित घुगे, अमोल पाटील आदी उपस्थित होते.
अतिशय सुंदर मांडणी असलेल्या व्रत सेवेचं या पुस्तकात दिनकर पाटील यांनी त्यांनी चार दशकांत केलेल्या कामांसोबतच त्यांच्या भविष्यातल्या योजनांचीही विस्तृत माहिती या पुस्तकात देण्यात आली आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी दिनकर पाटील यांच्या कार्याचा गौरव केला.