Saturday, May 4, 2024
Homeजळगावडंपरने धडक दिल्याने पुजाऱ्याचा मृत्यू

डंपरने धडक दिल्याने पुजाऱ्याचा मृत्यू

अमळनेर : amalner

डंपरने मागाहून धडक दिल्याने शनी मंदिरावरील पुजाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना १४ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास बोरी नदीच्या फरशी पुलावर घडली.

- Advertisement -

शनी मंदिराचे पुजारी मनोज वासुदेव उपासनी वय ४७ हे आपली मोटरसायकल एम एच ०३, बी जी ०९१२ वर दुपारी दीड वाजेच्या सुमारास फरशी पुलावरून जात असताना मागाहून येणाऱ्या एम एच ११, ए एल ५७८३ या डम्परने धडक दिल्याने उपासनी याची मोटरसायकल डंपरच्या चाकात अडकून तो ५० ते ६० मीटर फरफटत ओढला गेला, आणि पुलावरील फुटपाथच्या दगडाचा मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. उपासनी याच्या पुतण्याने अमळनेर पोलीस स्टेशनला खबर दिल्यावरून डंपर चालकविरुद्ध अपघाताचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या