Wednesday, May 6, 2026
HomeनगरAhilyanagar : 82 हजार हेक्टरवर कडधान्य पिकांचा पेरा

Ahilyanagar : 82 हजार हेक्टरवर कडधान्य पिकांचा पेरा

पावसाची रिपरिप || खरीपाच्या पेरण्या संथगतीने

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

जिल्ह्यात यंदा 19 जूनपर्यंत 82 हजार हेक्टरवर खरीप हंगामातील कडधान्य पिकांची पेरणी पूर्ण झालेली आहे. दरम्यान, जिल्ह्यात अनेक भागात ढगाळ वातावरण असून पावसाची रिपरिप सुरू आहे. काही ठिकाणी अद्याप वाफसा न झाल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या संथ गतीने सुरू आहेत.

- Advertisement -

कृषी विभागाच्या माहितीनूसार नगर जिल्ह्याच्या दक्षिण भागात कडधान्य पिकाचे क्षेत्र अधिक आहे. या ठिकाणी मूग, उडिद यासह तूर पिक मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. नगर, पारनेर, जामखेड, कर्जत, पाथर्डी या भागात मूग आणि उडिद पिकाचे क्षेत्र अधिक असून उर्वरित ठिकाणी सिंचनाची सोय असल्याने शेतकरी सोयाबीन, कपाशी आणि चारा पिके घेत असतात. यंदा मे महिन्यांत जिल्ह्याच्या विविध भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. यामुळे शेतकर्‍यांना कडधान्य पिकांच्या पेरणीस संधी मिळाली. दरम्यान, दक्षिणेतील अनेक तालुक्यात अद्याप पेरणीसाठी वापसा नसल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या या संथगती सुरू आहेत.

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी कृषी विभागाकडून 7 लाख 88 हजार सरासरी क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यात 2 लाख 38 हजार हेक्टरवर पेरण्या झालेल्या असून यात कडधान्य पिकांचा पेरा हा 1 लाख 38 हजार हेक्टर आहे. यात तूर पिकाचे क्षेत्र 17 हजार 294 हेक्टर, मूग 28 हजार 145 हेक्टर, उडिद 35 हजार 898 हेक्टर व इतर कडधान्य 628 हेक्टर असे एकूण 82 हजार 337 हेक्टर कडधान्य पिकांची पेरणी झालेली आहे. यासह जिल्ह्यात बाजारी पिकाची 22 हजार 735 हेक्टर, मका 31 हजार 388 हेक्टर, सोयाबिन 49 हजार 729 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.

50 हजार हेक्टरवर कपाशी लागवड
जिल्ह्यात अनेक ठिकाणी जून महिन्यांच्या आधी कपाशी लागवड सुरू झाली. आतापर्यंत जिल्ह्यात 50 हजार 186 हजार हेक्टरवर कपाशी लागवड झालेली आहे. हे क्षेत्र येत्या काही दिवसात दुप्पट होण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने यंदा जिल्ह्यात 1 लाख 56 हजार हेक्टरवर कपाशी लागवड प्रस्तावित केलेली आहे. अनेक ठिकाणी उशीरापर्यंत कपाशी लागवड सुरू राहणार असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

ताज्या बातम्या

दिंडोरी उपजिल्हा रुग्णालयासाठी जागा हस्तांतराचे आदेश

0
दिंडोरी | प्रतिनिधी Dindori दिंडोरी येथे उपजिल्हा रुग्णालयासाठी महाराष्ट्र राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या विशेष प्रयत्नांने आठ एकर जागा हस्तांतराचा आदेश...