Saturday, May 17, 2025
Homeनगरपुनतगाव-पाचेगाव परिसरात बिबट्याचा हैदोस

पुनतगाव-पाचेगाव परिसरात बिबट्याचा हैदोस

पाचेगाव |वार्ताहर| Pachegav

- Advertisement -

नेवासा (Newasa) तालुक्यातील पुनतगाव (Punatgav) व पाचेगाव (Pachegav) परिसरात बिबट्याने (Leopard) हैदोस घातला आहे. मागील तीन दिवसात 6 पाळीव प्राण्यांवर हल्ला (Animals Attack) करुन त्यांचा बळी घेतल्याने परिसरात बिबट्याची दहशत (Leopard Terror) निर्माण झाली आहे.

अनेक नागरिकांना बिबट्याचे दर्शन घडत आहे, त्यामुळे या भागात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुनतगाव व पाचेगाव मध्ये गेल्या दोन-तीन दिवसात सहा पाळीव प्राण्यांवर हल्ला (Animals Attack) करीत ठार केले. त्यामुळे दोन्ही गावातील नागरिकांनी बिबट्या जेरबंद करण्यासाठी पिंजरा (Cage) लावण्याची मागणी वनविभागाच्या कर्मचार्‍यांना केली आहे.

शिर्डीकरांना पूर्वीप्रमाणेच मंदिरात दर्शनासाठी प्रवेश

पुनतगाव येथील कचरू भाऊराव गंधारे असे या शेतकर्‍याचे नाव असून त्यांच्या पुनतगाव शिवारातील गट नं. 4 मध्ये कुटुंबासह ते वस्ती करून राहतात. घरासमोर असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये तीन शेळ्या व बोकड बांधलेल्या असताना मंगळवारी रात्री 9 च्या सुमारास बिबट्याने या शेळ्यांवर हल्ला (Attack On Goats) केला. या हल्ल्यात एक शेळी व एक बोकड ठार झाले. त्याच रात्री श्याम दादा मकासरे यांची शेळी जखमी (Injured) केली. दिगंबर धर्माजी पवार यांच्या तसेच आणखी एका घरासमोरून पाळीव कुत्र्याची बिबट्याने शिकार केली. पाचेगाव (Pachegav), कारवाडी (Karwadi) शिवारात राहत असणार्‍या हरिभाऊ भगवान जाधव यांच्या घरासमोरील बांधलेल्या गावरान लहान कालवडीवर हल्ला करुन ठार केले आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात जवळपास सहा पाळीव प्राणी ठार झाले आहे. त्यामुळे या भागात बिबट्याची मोठी दहशत निर्माण झाली. सध्या शेतीत खरिपात घेतलेल्या पिकांची खुरपणी व इतर शेती निगडीत कामे सुरू आहे. त्यामुळे मजूर व शेती मालक बिबट्याच्या धास्तीने शेतात जाण्यास तयार नाही. त्यामुळे वनविभागाने (Forest Department) या भागात पिंजरा लावावा अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. घटनेचा वनविभाग कर्मचार्‍यांनी पंचनामा केला. यावेळी पोपट मुरलीधर काळे, ज्ञानदेव साहेबराव आरसुळे, दत्तात्रय पवार, वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

भंडारदरा, मुळा धरणात एवढा टक्के पाणीसाठा !

पाचेगाव व पुनतगावमध्ये एकापेक्षा अधिक संख्येने बिबटे दिसून येत आहेत. दोन्ही शिवारात बिबट्याने अनेक जणांना दर्शन दिले असून अनेकांची कुत्री फस्त केली आहे. त्यामुळे पाचेगाव पुनतगाव परिसरात बिबट्याचा वावर नागरिकांना त्रासदायक ठरत असून वनविभागाने या बिबट्याचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे.

शासकीय जमिनीवरील अतिक्रमण नियमानुकूल प्रकरणी खंडपीठाची प्रशासनाला नोटीस‘आवास’ योजनेसाठी ओबीसी लाभार्थ्यांची स्वतंत्र यादी

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

नीरज चोप्राने ९०.२३ मीटर भाला फेकत केली नव्या विक्रमाची नोंद

0
भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने दोहा डायमंड लीग स्पर्धेत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. दोहा डायमंड लीग स्पर्धेत नीरज चोप्राने तिसऱ्या प्रयत्नात ९०. २३ मीटर लांब...