Wednesday, September 30, 2026
Homeब्रेकिंग न्यूजPune Accident : कुंडेश्वर दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या पिकअपचा अपघात; चौघांचा मृत्यू, अनेक...

Pune Accident : कुंडेश्वर दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या पिकअपचा अपघात; चौघांचा मृत्यू, अनेक जखमी

पुणे | Pune

आज तिसरा श्रावण सोमवार (Shravan Somvar) असल्याने राज्यभरातील शिव मंदिरात (Shiv Mandir) भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळत आहे. अनेक मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यांवर वाहनांच्या व भाविकांच्या लांबच लांब रांगा दिसून येतात. मात्र, अशातच आता पुणे जिल्ह्याच्या (Pune District) खेड तालुक्यातील (Khed Taluka) कुंडेश्वर येथे दर्शनाला जाताना भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात चार महिलांचा मृत्यू झाला असून, २० हून अधिक महिला जखमी आहेत.

- Advertisement -

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, दुपारी एक वाजेच्या सुमारास हा अपघात (Accident) घडला असून, चालकाचे पिकअपरील नियंत्रण सुटल्याने वाहन थेट खोल दरीत कोसळले. या पिकअपने (Pickup) ५ ते ६ पलटी खाल्ल्याने त्यातील २५ ते ३० महिला भाविक गंभीर जखमी झाल्या आहेत. तर चार महिलांचा मृत्यू (Death) झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, या अपघातानंतर (Accident) रुग्णवाहिकांच्या माध्यमातून जखमींना तातडीने खासगी रुग्णालयात व चांडोली येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ मदतीसाठी प्रयत्न केले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : अर्ज खरेदीला इच्छुकांच्या उड्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांकडून प्रयत्न सुरू असतानाच उमेदवारी अर्ज खरेदीसाठी इच्छुकांची झुंबड उडाली आहे. उमेदवारी अर्ज विक्रीच्या...