Tuesday, June 17, 2025
Homeमहाराष्ट्रपुणे विमानतळावर 48 लाखांचे हिरे जप्त

पुणे विमानतळावर 48 लाखांचे हिरे जप्त

पुणे |प्रतिनिधी| Pune

पुणे विमानतळावर (Pune Airport) कस्टम विभागाच्या (Custom Department) अधिकाऱ्यांनी युनायटेड अरब अमिरात (युएई) (UAE) येथून आलेल्या विमानातील एका प्रवाशाच्या ताब्यातून ४८ लाख ६६ हजार रुपये किंमतीचे हिरे जप्त (Diamonds Seized) केले आहेत. याप्रकरणी पुण्यातील काेंढवा भागात राहणाऱ्या ३२ वर्षीय तरुणाला कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढील चाैकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

- Advertisement -

पुण्यातील काेंढवा (Kondhawa) परिसरात राहणारा हा युवक जानेवारी महिन्यात युएईमध्ये (UAE) गेला हाेता. त्याठिकाणी दाेन महिने वास्तव्य केल्यानंतर शारजाहून ताे विमानाद्वारे पुणे विमानतळावर (Pune Airport) आला. विमानतळावर (Airport) त्याची हालचाल संशयास्पद आढळून आल्याने कस्टम अधिकाऱ्यांनी त्याला अडवून त्याच्याकडील सामानाची तपासणी केली. त्यावेळी त्याच्या ताब्यातील सामानात पॅकिंग केलेल्या ट्राऊझर्सच्या पाऊचमध्ये लपवून ठेवण्यात आलेले हिरे जप्त (Diamonds Seized) करण्यात आले.

त्याच्या सामानाची कसून तपासणी केली असता त्यात एकूण ७५ कॅरेट वजनाचे सुमारे तीन हजार हिरे (गाेल चमकदार कट आणि बॅगेटस) सापडल्याची माहिती सीजीएसटी कमिशनर यशाेधन वनगे यांनी दिली आहे. याप्रकरणी संशयित तरुणावर भारतात हिरे तस्करी करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सीमाशुल्क कायदा १९६२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडील हिरे जप्त (Diamonds Seized) करण्यात आले आहेत. शारजा येथून भारतात हिरे कॅरिअरचे काम करण्याकरिता त्याचा वापर करण्यात आला हाेता आणि त्याकरिता ठराविक रक्कम माेबदला म्हणून मिळणार हाेती. त्याचे शारजाहून तिकिट काेणीतरी 011 व्यक्तीने काढून दिलेले असून संबंधित हिरे (Diamonds) ताे नेमका काेणाला देणार हाेता, याबाबत सखाेल तपास करण्यात येत असल्याची माहिती कस्टम विभागाचे (Custom department) अधिकारी धनंजय कदम यांनी दिली.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Sharad Pawar : “कुणाशीही संबंध ठेवा, पण भाजपशी…”; राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर शरद...

0
मुंबई | Mumbai राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट एकत्र येणार असल्याची जोरदार चर्चा सुरु होती. तसेच राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांनी केलेल्या विधानांमुळे...