Tuesday, January 6, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमोठी बातमी! भाजपच्या अधिकृत उमेदवाराला निवडणुकीतून माघारीची नामुष्की; पहलगाम हल्ला, फडणवीसांवर टीका...

मोठी बातमी! भाजपच्या अधिकृत उमेदवाराला निवडणुकीतून माघारीची नामुष्की; पहलगाम हल्ला, फडणवीसांवर टीका करणं भोवलं

पुणे | Pune
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शहरात घडामोडींना वेग आला आहे. महापालिका निवडणुकीमध्ये भाजपने प्रभाग क्रमांक २ मधून पूजा मोरे यांना उमेदवारी दिली होती. मात्र या उमेदवारीवरून प्रचंड टीका पक्षावर होत होती. त्यामुळे अखेर पूजा मोरे यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

पूजा मोरे यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांना भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले होते, ट्रोलिंगमुळे पुजा मोरेने पुणे मनपाची उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. प्रभाग क्रमांक २ मधून भाजपने त्यांना तिकिट दिले होते. ट्रोलर्सने पुजा जाधव यांचे जुने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधी व्हिडिओ काढून ट्रोलिंग सुरू केले होते.

- Advertisement -

नेमके काय म्हणाल्या पुजा मोरे?
पूजा मोरे यांनी पहलगाम हल्ल्यानंतर दिलेली प्रतिक्रिया आणि फडणवीसांवर केलेले टीका यावरून कार्यकर्त्यांकडून प्रचंड ट्रोल केले जात होते. त्यानंतर अर्ज मागे घेतल्यानंतर पूजा मोरे यांच्या डोळ्यात पाणी आले. त्या म्हणाल्या की, माझा प्रवास खूप सामान्य घरातून झाला आहे. मी धनंजय जाधव यांच्याशी लग्न करून या पुण्यात राहायला आले. पोलिसांच्या लाठ्याकाठ्या खात शेतकऱ्यांसाठी गुन्हे अंगावर घेतले. कोर्टाच्या चकरा मारल्या. न्यायालयात खटले लढवायला माझ्याकडे पैसे नसायचे या परिस्थितीतून मी पुढे आलीय. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला मोठ्या पक्षाची उमेदवारी मिळत नाही. ते भाग्य माझ्या नशिबात आले होते. या पक्षातून एखाद्या पदावर जात तळागाळातील लोकांसाठी न्याय देण्याचे काम मला करायचे होते. परंतु माझ्या आयुष्यात झालेल्या एका छोट्या चुकीचा मोठा बाऊ करून माझ्याविरोधात षडयंत्र झाले. त्याच्या मला वेदना होतायेत असे सांगत त्यांनी सांगितले.

YouTube video player

लाडक्या बहीणींना सरकारचं नव वर्षाचं गिफ्ट; बँक खात्यात १५०० जमा व्हायला सुरवात, तुम्हाला मिळाले का?

पुजा मोरे पुढे म्हणाल्या, मी बिन लग्नाची मुलगी होते, राजकारण घाणेरडे असते असे सगळे म्हणतात, पण बापाने सगळे करू दिले, लग्नानंतर नवी नवरी राहिली नाही, दुसऱ्या दिवशी कामासाठी बाहेर पडली, पहालगामच्या हल्ल्यावेळी काम केले, ८ दिवस तिथे होतो. लाल चौकात आंदोलन केले. दहशतवाद्यांना हिंदू मुस्लिम करायचे आहे असे समजून मी भूमिका मांडली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाले. प्रभाग २ मधील अनेकांना माझ राजकारण सहन होत नाही, त्यांनी माझे व्हिडीओ बनवले. मुंबईत २० व्या वर्षी मराठा समाजाच्या भावना मांडल्या. विरोधकांची प्रभागाची टीम आहे. त्याची व्हिक्टिम मी बनत आहे. राहुल गांधीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. तेव्हा शेतकऱ्यांचा प्रश्न घेऊन मी राहुल गांधींकडे गेले होते, असेही त्यांनी पत्रकार परिषदेत म्हटले.

Pune News: पुण्यातील घडामोडीवर उध्दव कांबळेंचं स्पष्टीकरण; म्हणाले, “मी एकनिष्ठ आहे, १०० टक्के कबुल करतो की,…”

तसेच मी लढणारी मुलगी आहे. मी संघर्ष करत राहणार. माझा भाजपात प्रवेश झाला आहे. मला पक्षाची उमेदवारीही मिळाली होती. मी हिंदू धर्म संस्कृतीत पती हा आपल्यासाठी देवासारखा असतो. माझे १०-१५ वर्षापूर्वीचे आयुष्य पूर्ण वेगळे होते. मी ग्रामीण भागात वाढलीय. कारखानदाराच्या विरोधात मी शेतकऱ्यांचा लढा लढला आहे असे पूजा यांनी म्हटले.

पुढे त्यांनी म्हटले की, विरोधकांनी हे षडयंत्र केले आहे. माझ्या पतीला देव मानून आणि सगळे ऐकून त्यांचे आभार मानते. भाजपचे आभार मानते. ८बाय १० च्या खोलीत धनंजय जाधव मोठे झाले आहेत. सामान्य माणसाचा बळी घेतला जातो. पोस्ट टाकून मुलीचे आयुष्य वाया जाते. मी भाजपमध्ये काम केले, संघ परिवाराने मला समजून घेतले. मी स्वतः हिंदू आहे. हिदुत्वासाठी काम करेल. झालेल्या चुकांबद्दल माफी मागते. जिथे भाजपला गरज आहे तिथे काम करते. वाघीण जखमी झाल्यावर ती अजून जोरात काम करते. राजकीय आयुष्य आपल्या दोघांच आहे. माझामुळे तुमच्या राजकीय जीवन मागे गेलं असेल तर मला माफ करा, असे म्हणत पूजा मोरे-जाधव यांनी यावेळी नवऱ्याची माफी मागितली. आता आम्ही निवडणूक लढणार नाही सगळे अर्ज मागे घेतले, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे.

ताज्या बातम्या

सुरेश

पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडींचं निधन; वयाच्या ८२व्या वर्षी घेतला अखेरचा...

0
पुणे | Puneकाँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे माजी खासदार सुरेश कलमाडी यांचे आज (6 जानेवारी 2026) पुण्यातील वयाच्या ८२ व्या वर्षी दीर्घ आजाराने...