पुणे | प्रतिनिधी
अजित पवार मला काय म्हणतात याचे मला घेणे नाही. लोक मात्र माझ्याबाबतीत शांत आहेत, संयमी आहेत, चांगले बोलतात, अंगावर धावून येत नाहीत. कामे करतात असे बोलतात ते महत्त्वाचे आहे. अजित पवारांना स्वत:वर झालेला अन्याय शब्दबद्ध करता येत नाही. ते सांकेतिक भाषेत बोलत राहतात. त्यामुळे अजित पवार आपल्यावर काय अन्याय झाला आहे ते पत्रकार परिषद घेऊन सांगावे असे, प्रत्युत्तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार यांना दिले.
महायुतीमधल्या घटक पक्षांचा या निवडणुकीबाबत मेळावा झाला. या मेळाव्याला सर्व पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. मेळाव्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. चंद्रकांत पाटील म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाची घर फोडण्याची मोठी परंपरा आहे. त्यावर लवकरच पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार आहे. सत्ता आल्यानंतर त्याचा दुरुपयोग कोणी केला, विश्वासघात कोणी केला.
“उद्धव ठाकरेंना आधीच सांगितलं होतं, पण…”; शिंदे गटाच्या बंडाबाबत अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
उद्धवजींची शिवसेना रोज उठून गद्दारी केली म्हणत आहे. तुम्ही 2019 ला काय केले. तुम्ही गद्दारीच केली ना. राष्ट्रवादी म्हणत आहे. यांनी यांची माणसे पळवली. पण तुम्ही आमच्या उद्धवजींना पळवले. आमचे अतिशय गुण्यागोविंदाने चालले होते. तुम्ही त्यांना फितवले, पळवले अशा शब्दात नाना पटोले यांच्यावर पाटील यांनी आगपाखड केली.
आम्ही सर्वजण सहनशील आहोत म्हणजे भित्रे नाही. घर कोणी कोणाची फोडली, गद्दारी कोणी केली, पाठीत खंजीर कोणी खुपसला. यावर वेगळी पत्रकार परिषद घेण्याची इच्छा असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
अबुधाबीहून केरळला येणाऱ्या Air India च्या विमानाला हवेतंच लागली आग अन्…
रात्री उशिरा दोन्ही जागांसाठी भाजपचा उमेदवार जाहीर होणार
आ. मुक्ता टिळक यांच्या निधनाने कसबा विधानसभेची तर लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड विधानसभेची जागा रिक्त झाली आहे. या दोन्ही जागांसाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून, आज रात्री उशिरा दोन्ही जागांसाठी भाजपचा उमेदवार जाहीर होणार असल्याची माहिती पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीसंदर्भात चंद्रकांत पाटील यांनी आज भाजप-शिंदे गट आणि इतर संघटनांसोबत बैठक घेतली. त्यावेळी ते म्हणाले, कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख 6 फेब्रुवारी आहे. मात्र, अद्याप कोणत्याही पक्षाने उमेदवार जाहीर केलेले नाहीत. भाजपकडे इच्छुकांची यादी तयार आहे. त्यामधून दोघांची या जागांसाठी निवड होईल. आज रात्री उशिरा आम्ही भाजपचे उमेदवार जाहीर करू. जाहीर होणाऱ्या उमेदवारांची अर्ज भरण्याची वेळ आम्ही ठरवली आहे. ६ फेब्रुवारीला हे दोन्ही अर्ज भरले जातील. सकाळी ११ वाजता कसबा विधानसभेसाठी अर्ज भरला जाईल. तर दुपारी १ वाजता चिंचवडच्या उमेदवाराचा अर्ज दाखल केला जाणार आहे.
राणेंच्या अडचणी वाढणार? राऊतांनी पाठवली मानहानीची नोटीस