Monday, June 22, 2026
Homeक्राईमCrime News : वाहतूक नियंत्रण कक्षातील कर्मचार्‍याला मारहाण

Crime News : वाहतूक नियंत्रण कक्षातील कर्मचार्‍याला मारहाण

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

मुलीला त्रास देणार्‍या तरुणाला जाब विचारल्याचा राग मनात धरून, पुणे बसस्थानकावरील वाहतूक नियंत्रण कक्षात घुसून एका कर्मचार्‍याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात कर्मचारी जखमी झाले असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

कल्याण भवर (रा. सुलेमान देवळा, ता. आष्टी, जि. बीड) आणि त्याच्या दोन अनोळखी साथीदारांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी कर्मचार्‍याची मुलगी अहिल्यानगर शहरातील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वी कल्याण भवर याने मुलीला गाठून बोलण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकाराबाबत फिर्यादीने कल्याण याला जाब विचारला असता त्यांच्यात बाचाबाची झाली होती. याच वादाचा वचपा काढण्यासाठी कल्याण याने आपल्या साथीदारांसह गुरुवारी बसस्थानक गाठले. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कर्तव्यावर असलेल्या फिर्यादीला कक्षाबाहेर बोलावून संशयितांनी शिवीगाळ केली. तू खूप माजला आहेस का? असे म्हणत तिघांनी त्यांना मारहाण केली.

याचवेळी कल्याण याने हातातील हातोडीने फिर्यादीवर प्रहार करून जखमी केले. तेथे उपस्थित असलेल्या फिर्यादीच्या सहकार्‍यांनी मध्यस्थी करत सुटका केली. पळून जाताना संशयित आरोपींनी त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादीने जिल्हा रुग्णालयात उपचार घेतले असून, कोतवाली पोलीस ठाण्यात कल्याण भवर व इतर दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याची...

0
ओझे l वार्ताहर | Oze नाशिक शहरात (Nashik City) अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याची खोटी बतावणी करून बेकरी व्यावसायिकांकडून पैसे उकळणाऱ्या तिघांविरुद्ध एमआयडीसी...